शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅम्बुुुलन्स न पोहोचल्याने गर्भातच दगावले अर्भक

By admin | Updated: October 14, 2016 01:04 IST

प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर आरोग्य केंद्राच्या रूग्णवाहिकेला पाचारण केले. मात्र, डिझेलअभावी रूग्णवाहिका पोहोचू शकली नाही.

वरुड : प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर आरोग्य केंद्राच्या रूग्णवाहिकेला पाचारण केले. मात्र, डिझेलअभावी रूग्णवाहिका पोहोचू शकली नाही. अखेरीस रूग्णवाहिकेच्या प्रतीक्षेत गर्भवती महिलेच्या पोटातच अर्भक दगावले. ही दुर्देवी घटना तालुक्यातील पुसला प्राथमिक आरोग्य केंद्रांंतर्गत १० आॅक्टोबर रोजी घडली. कारली या सातपुड्याच्या डोंगरदऱ्यांमध्ये वसलेल्या गावातील इंदिरा भारत चौधरी (२३) या गर्भवती महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्याने पुसला प्राथमिक स्वास्थ्य केंद्रातून रूग्णवाहिका बोलावण्याकरिता गावकऱ्यांनी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष विजय श्रीराव यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. विजय श्रीराव यांनी संबंधित आरोग्य केंद्राशी संपर्क साधला असता डिझेलअभावी रूग्णवाहिका पोहोचू शकत नसल्याचे सांगण्यात आले. या आरोेग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी राहुल भुतडा १५ दिवसांपासून सुटीवर आहेत. इतकेच नव्हे, तर त्यांनी रजेवर जाण्यापूर्वी त्यांचा प्रभार अन्य सहायक वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे दिलेला नाही. २५ कि.मी.वरून मागविले वाहनवरुड : रूग्णवाहिकेच्या मेंटेनन्सचा प्रश्न उभा ठाकला आहे. अखेर कारला येथून २५ कि.मी अंतरावरील जामगांवातून खासगी वाहन घेऊन प्रसूती वेदनांनी विव्हळणाऱ्या महिलेला पहाटे पाच वाजताच्या दरम्यान पुसला येथील आरोग्य केंद्रात आणण्यात आले. मात्र, येथे डॉक्टर आणि सुविधांचा अभाव असल्याने तिला वरूडला पाठविण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने तिला अमरावतीला हलविण्याचा सल्ला दिला गेला. मात्र, प्रकृती क्षणाक्षणाला ढासळत असल्याचे पाहून तिला अमरावतीला न नेता वरूड येथील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तिची प्रसूती करण्यात आली. मात्र, तोवर गर्भातील बाळ पोटातच दगावले होते. तूर्तास गर्भवती महिलेची प्रकृती स्थिर असली तरी आरोग्य विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे तिला जन्मापूर्वीच अपत्य गमवावे लागले. सुटीवर जाताना वैद्यकीय अधिकारी राहुल भुतडा यांनी अन्य सहायक अधिकाऱ्याकडे प्रभार सोपवून जाणे आवश्यक होते. परंतु कोणावरही जबाबदारी न सोपविता ते सुटीवर निघून गेल्याने या आरोेग्य केंद्रातील एकूणच कारभार ढेपाळला आहे. या घटनेनंतर बीडीओ सुभाष भोपते, पीएमओ अमोल देशमुख यांनी बुधवारी कारली गावात पोहोचून चौकशी सुरु केली. जिल्हा आरोग्य प्रशासनाने अद्यापही या घटनेबाबत कोणतीही कारवाई केली नसल्याने तीव्र असंतोष व्यक्त केला आहे.