शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
5
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
6
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
7
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
8
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
9
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
10
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
11
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
12
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
13
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
15
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
16
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
17
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
18
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
19
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
20
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
Daily Top 2Weekly Top 5

एडमीन हैदराबादचा तर, पोस्ट पाठविणारा उत्तर प्रदेशचा

By admin | Updated: October 25, 2015 00:20 IST

'व्हॉट्सअ‍ॅप'वर धार्मिक भावना दुखावणारे छायाचित्र पोस्ट केल्याने शुक्रवारी सायंकाळनंतर चपराशीपुऱ्यात तणाव निर्माण झाला होता.

अमरावती : 'व्हॉट्सअ‍ॅप'वर धार्मिक भावना दुखावणारे छायाचित्र पोस्ट केल्याने शुक्रवारी सायंकाळनंतर चपराशीपुऱ्यात तणाव निर्माण झाला होता. फे्रजरपुरा पोलिसांनी छायाचित्र पाठविणाऱ्या मोबाईल क्रमांकाधारकाविरुध्द गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केल्यावर 'व्हॉट्स अ‍ॅप' समूहाचा एडमीन हैदराबादचा तर पोस्ट पाठविणारा उत्तर प्रदेशातील इटावा येथील रहिवासी असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. आता सायबर गुन्ह्याविषयीची चौकशी पूर्ण झाल्यावर पोलीस आरोपीला अटक करण्याकरिता रवाना होणार आहे. पोलीस सूत्रानुसार, पठाण चौकाजवळील गुलजार नगरातील रहिवासी जाकीर हुसेन गुलाम हुसेन यांच्या 'व्हॉटसअ‍ॅप' क्रमांकावर शुक्रवारी सायंकाळी धार्मिक भावना दुखावणाऱ्या छायाचित्रांचा संदेश आला. याबाबत विशेष समुदायातील नागरिकांना कळताच हजारो नागरिकांनी पोलीस आयुक्तालयाकडे धाव घेऊन आरोपीविरुध्द तत्काळ कारवाईची मागणी पोलिसांकडे केली. एकाच वेळी हजारो नागरिक रस्त्यावर उतरल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती. नागरिकांनी परिसरातील व्यावसायिकांना आपापली प्रतिष्ठाने बंद करण्याच्या सूचनादेखील दिल्या होत्या. पोलिसांनी प्रसंगावधान राखून तणाव शांत करण्याचा प्रयत्न केला. तसेच विशेष समुदायीतील धर्मगुरूंनीही नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केल्यानंतर तणाव निवळला. याप्रकरणी फे्रजरपुरा पोलिसांनी मोबाईल क्रमांक ८३०७२२२१७४ च्या धारकाविरुध्द भादंविच्या कलम २९५(अ) अन्वये गुन्हा दाखल करून तपासकार्य सुरूकेले आहे. या चौकशीत 'व्हॉट्सअ‍ॅप'चा एडमीन हैदराबादचा व पोस्ट पाठविणारा उत्तर प्रदेशातील इटावा येथील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. तसेच 'व्हॉट्स अ‍ॅप'वरील अन्य मोबाईल क्रमांक आंध्र प्रदेश व उत्तर प्रदेशातील असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. याप्रकरणी पोलीस सखोल चौकशी करीत असून गुन्हा निष्पन्न झाल्यास आरोपीला अटक करण्यासाठी पोलीस पथक रवाना तेथे होणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)