शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
2
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
3
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
4
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
5
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
6
Top Marathi News Live: नाशिक: भोंदू अशोक खरातविरुद्ध SITकडून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल
7
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
8
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
9
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
10
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
11
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
12
Travel : लडाखमध्ये इंजिन बंद असूनही गाड्या आपोआप चढतात डोंगर; या 'मॅग्नेटिक हिल'चं रहस्य काय?
13
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
14
भयंकर! फक्त एका लिंबूसाठी १२ वर्षांच्या मुलाची हत्या; संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक
15
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
16
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
17
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
18
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
19
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
20
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील शेकडो कर्मचार्‍यांना पोस्टल बॅलेट अद्यापही अप्राप्तच

By admin | Updated: May 8, 2014 00:45 IST

निवडणूक प्रक्रियेतील कर्मचार्‍यांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी 'टपाली मतदानाची सुविधा दिली जाते. त्यासाठी आवश्यक अर्ज स्वीकारले जातात.

चांदूरबाजार : निवडणूक प्रक्रियेतील कर्मचार्‍यांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी 'टपाली मतदानाची सुविधा दिली जाते. त्यासाठी आवश्यक अर्ज स्वीकारले जातात. ही सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरही या कर्मचार्‍यांना अद्यापही 'टपाली मतपत्रिका' प्राप्त झाले नाही. त्यामुळे शेकडो कर्मचारी मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
चांदूरबाजार येथील १३ उर्दू शिक्षकांचा निवडणूक प्रक्रियेत समावेश असून त्यांनी मतदानापासून वंचित ठेऊ नये, अशी विनंती केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. टपाली मतपत्रिका उपलब्ध करून द्यावे, यासंबंधीचे निवेदन त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग, विभागीय आयुक्त, जिल्हा निवडणूक अधिकारी व सहायक निवडणूक अधिकार्‍यांना दिले आहे. १0 एप्रिल रोजी झालेल्या लोकसभा मतदान प्रक्रियेत या १३ श्क्षिकांना जिल्ह्यातील वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर पाठविण्यात आले होते. त्यावेळी त्यांना टपाली मतपत्रिका पाठविण्याची व्यवस्था केल्याचे सांगण्यात आले. यासाठी ३0 मार्च रोजी झालेल्या प्रशिक्षण कार्यशाळेत या शिक्षकांना पोस्टल बॅलेटसाठी आवश्यक अर्ज देण्यात आले. त्यानुसार हे अर्ज योग्य माहिती भरून देण्यात आले. मतदानानंतर किमान एक आठवड्यापर्यंत टपाली मतपत्रिका या शिक्षकांना मिळणे अपेक्षित होते. मात्र, अद्यापही १३ शिक्षकांनाच नव्हे तर जिल्ह्यातील शेकडो कर्मचार्‍यांना टपाली मतपत्रिका प्राप्त झाले नसल्याचे या शिक्षकांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठविलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
याबाबत या शिक्षकांनी वेळोवेळी संबंधित अधिकार्‍यांना टपाली मतपत्रिकेची मागणी केली. मात्र, टपाली मतपत्रिका पाठविण्याची प्रक्रिया सुरू असून वेळेत जिल्ह्यातील इतर कर्मचार्‍यांना मतपत्रिका प्राप्त होतील, असेच सांगण्यात आले. मात्र, प्राप्त झाले नसल्याने मतदानापासून वंचित राहण्याची भीती या शिक्षकांनी व्यक्त केली आहे. मतमोजणीला केवळ आठवडा शिल्लक असताना या शिक्षकांना टपाली मतपत्रिका मिळेल काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (तालुका प्रतिनिधी)