शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
2
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
3
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
4
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
5
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
6
Top Marathi News Live: नाशिक: भोंदू अशोक खरातविरुद्ध SITकडून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल
7
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
8
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
9
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
10
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
11
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
12
Travel : लडाखमध्ये इंजिन बंद असूनही गाड्या आपोआप चढतात डोंगर; या 'मॅग्नेटिक हिल'चं रहस्य काय?
13
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
14
भयंकर! फक्त एका लिंबूसाठी १२ वर्षांच्या मुलाची हत्या; संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक
15
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
16
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
17
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
18
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
19
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
20
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
Daily Top 2Weekly Top 5

वैयक्तिक शौचालय योजनेला घरघर

By admin | Updated: May 8, 2014 00:44 IST

शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातर्फे महापालिकेला अनुसूचित जाती व नवबौध्द् घटकांसाठी वैयक्तिक शौचालय आणि नळयोजनेसाठी १८ कोटींचे अनुदान दिले होते.

महापालिकेत निधी पडून : नवबौध्द, अनुसूचित जातींवर अन्याय


अमरावती : शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातर्फे महापालिकेला अनुसूचित जाती व नवबौध्द् घटकांसाठी वैयक्तिक शौचालय आणि नळयोजनेसाठी १८ कोटींचे अनुदान दिले होते. मात्र, दोन वर्षांचा कालावधी लोटल्यानंतरही या अनुदानाचा एक रूपयासुध्दा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचला नाही. यावरून महापालिकेच्या ढिसाळ कारभाराची कल्पना येते.
शहरात १0२ घोषित झोपडपट्टय़ा आहेत. या झोपडपट्टय़ांमधील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील सदस्यांना वैयक्तिक शौचालये आणि नळ योजनेचा लाभ मिळावा, यासाठी एका एजन्सीमार्फत सर्वेक्षण करण्यात आले. या योजनेसाठी लाभार्थ्यांची निवडही करण्यात आली. मात्र, शासनाने दिलेला निधी तोकडा असल्याने या योजनेचा लाभ मिळाला नाही, हे खरे आहे. अनेकांनी वैयक्तिक शौचालयासाठी टाक्याचे बांधकाम केले आहे. परंतु या टाक्यांचे कालांतराने खड्डय़ात रूपांतर झाले. योजनेंतर्गत शौचालय निर्माण झाले नसल्याने आजही नागरिकांना उघड्यावरच शौचास बसावे लागत आहे. या योजनेसाठी लागणारा निधी आणि बांधकाम साहित्याचे बाजारमूल्य तपासून डीपीआर पाठविला गेला नसल्याने शासनाने जुनाच दर गृहित धरुन वैयक्तिक शौचालये आणि नळ योजनेसाठी १८ कोटी रूपये मंजूर केल्याची माहिती आहे. दोन ते अडीच वर्षांपासून या योजनेच्या लाभाची प्रतीक्षा करणार्‍या लाभार्थ्यांच्या नशिबी निराशा आली आहे. १८ कोटी रूपये पडून असताना केवळ कागदी घोडे नाचविले जात आहेत. या योजनेतील काही लाभार्थ्यांचे धनादेश तयार आहेत. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच वैयक्तिक शौचालय योजनेचे धनादेश वितरित करण्याची प्रक्रिया राबविली जाईल. नळ योजनेची जबाबदारी मजीप्रावर सोपविली आहे.

निकषाप्रमाणे सर्व पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा नक्कीच लाभ मिळेल, कोणीही वंचित राहणार नाही.
ज्ञानेंद्र मेश्राम
शहर अभियंता, महापालिका