शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावरील होर्डिंग धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 06:00 IST

महामार्गावरील प्रामुख्याने अर्जुननगर चौकातील लावण्यात आलेल्या या अनधिकृत फलकांमुळे पंचवटीकडून येणारी वाहने अर्जुननगरातून महामार्गावर येणाऱ्या वाहनचालकांना दिसत नाही. त्यामुळे या ठिकाणी अपघाताची शक्यता आहे. या सर्व प्रकारांमुळे हा विभाग नागरिकांच्या अपघाताची वाट पाहतो काय, असा नागरिकांचा सवाल आहे. किंबहुना बाजार परवाना विभागाद्वारे कुठलीही कारवाई करण्यात येत नसल्याने या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत आहे.

ठळक मुद्देचौकाचे विद्रुपीकरण : नागरिकांच्या तक्रारी महापालिकेत कचऱ्याच्या पेटीत

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महामार्गावरील पंचवटी चौक ते रहाटगाव दरम्यान चौक अनधिकृत फलकांनी बुजले आहेत. त्यामुळे नगरातून महामार्गावर येणाºया नागरिकांना महामार्गावरील वाहन दिसत नाही. परिणामी या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी ही बाब बाजार परवाना विभागाच्या सहायक आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली असतानाही याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांच्या जिवावर उठलेल्या या बेकायदेशीर फलकांची दखल आयुक्त घेणार काय, असा नागरिकांचा सवाल आहे.शहर सौंदर्यीकरणाचे विद्रुपीकरण करणाऱ्या या चमकोबाजांवर महापालिकेच्या बाजार व परवाना विभागाची ‘कृपा’ असल्याने चौकाचौकांचे विद्रुपीकरण झालेले आहे. महापालिकेच्या उत्पन्नाला चुना लावणाऱ्या या होर्डिंगबाबत कुठलीही कारवाई होत नाही. त्यामुळे या बाजार व परवाना विभागावर नियंत्रण कुणाचे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.महामार्गावरील प्रामुख्याने अर्जुननगर चौकातील लावण्यात आलेल्या या अनधिकृत फलकांमुळे पंचवटीकडून येणारी वाहने अर्जुननगरातून महामार्गावर येणाऱ्या वाहनचालकांना दिसत नाही. त्यामुळे या ठिकाणी अपघाताची शक्यता आहे. या सर्व प्रकारांमुळे हा विभाग नागरिकांच्या अपघाताची वाट पाहतो काय, असा नागरिकांचा सवाल आहे. किंबहुना बाजार परवाना विभागाद्वारे कुठलीही कारवाई करण्यात येत नसल्याने या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत आहे.वाढदिवस, स्वागत, शुभेच्छा, विकास कामाचे भूमिपूजन, याशिवाय विविध कारणांसाठी बहुतांश नगरसेवकांद्वारे अनधिकृत होर्डिंग लावण्यात धन्यता मानली जाते. या नियमबाह्य कारभाराला चाप लावण्याचे काम महापालिकेच्या बाजार परवाना विभागाचे आहे. मात्र, अर्जुनगर चौकात या राजकीय व्यक्तींनीच अनधिकृत फलक लावले आहे. चौकाचे हे विद्रुपीकरण नागरिकांच्या जिवावर उठले आहे. बाजार व परवाना विभागाचे दुर्लक्षामुळे दिवसेंदिवस या प्रकारात वाढ होत आहे.दंड व शिक्षेची तरतूद - कारवाई केव्हा?बाजार परवाना विभागाद्वारे महाराष्ट्र मालमत्ता विरूपणास प्रतिबंध कायद्याचे अधिनियम १९९५ अंतर्गत प्रावधान आहे. यात तीन महिन्यांची शिक्षा व दोन हजारांचा दंड किंवा एकाच वेळी दोन्ही प्रकारची शिक्षा अश्ी तरतूद आहे. मात्र, बाजार परवाना विभाग कारवाई करीत नसल्यामुळे चमकोगिरीच्या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत आहे. खुद्द अनेक नगरसेवकांचीच फलके चौकांमध्ये अनधिकृतपणे लावलेली आहेत. आयुक्तांनी हा प्रकार गांभीर्याने घेऊन कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

टॅग्स :highwayमहामार्ग