शहरं
Join us  
Trending Stories
1
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
2
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
3
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
4
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
5
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
6
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
7
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
8
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
9
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
10
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
11
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
12
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
13
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
14
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
15
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
16
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
17
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
18
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
19
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
20
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांग मुलांसाठी ‘तो’ बनला आई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 06:00 IST

तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर येथील १२ बाय १० फुटाच्या खोलीत राहणारे नरेश कुत्तरमारे यांना दोन्ही मुले जन्मत:च दिव्यांग आहेत. मोठा मुलगा शुभम १३ वर्षांचा झाला तरी त्याला धड उभे राहता येत नाही. बोलता येत नाही. अनेक शासकीय रुग्णालयांत उपचारासाठी नेले; ९० टक्के दिव्यांग प्रमाणपत्राशिवाय काहीच मिळाले नाही. मुलगी गायत्री ११ वर्षांची. तिची शारीरिक, मानसिक स्थिती शुभमपेक्षाही कठीण.

ठळक मुद्देआदर्श । परिसरातच काम करून गुजराण

मोहन राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : प्रत्येक मुलासाठी आई महत्त्वाची असते. सुरुवातीची काही वर्षे तर मुले आईशिवाय राहूच शकत नाहीत. मात्र, दोन्ही मुले दिव्यांग जन्मल्यामुळे आई सोडून गेली, तर या दोन दिव्यांगांसाठी वडीलच आई बनले. अठराविश्वे दारिद्र्यात जगणाऱ्या बापाची ही कहाणी पाषाणहृदयालाही पाझर फोडणारी आहे.तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर येथील १२ बाय १० फुटाच्या खोलीत राहणारे नरेश कुत्तरमारे यांना दोन्ही मुले जन्मत:च दिव्यांग आहेत. मोठा मुलगा शुभम १३ वर्षांचा झाला तरी त्याला धड उभे राहता येत नाही. बोलता येत नाही. अनेक शासकीय रुग्णालयांत उपचारासाठी नेले; ९० टक्के दिव्यांग प्रमाणपत्राशिवाय काहीच मिळाले नाही. मुलगी गायत्री ११ वर्षांची. तिची शारीरिक, मानसिक स्थिती शुभमपेक्षाही कठीण. ना बोलता येत, ना चालता. दोन्ही मुले दिव्यांग जन्मल्याने नरेशची पत्नी २०१२ साली घर सोडून गेली. तेव्हापासून दोन्ही मुलांच्या प्रात:विधी, तोंड धुण्यापासून आंघोळीपर्यंत तर घास भरविणे असा त्यांचा दिनक्रम बनला आहे.संघर्षातही जीवन जगण्याची जिद्ददोन्ही मुले दिव्यांग असल्याने नरेश कुत्तरमारे यांना घर सोडून जाता येत नाही. बाहेर कामाला जायचे असेल, तर शुभमचे हातापाय बांधण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे नरेश घराच्या आजूबाजूला असलेली काही कामे करतात. शासनाकडून दोन्ही दिव्यांग मुलांना मानधन मिळते. त्यावर घरात काही धान्य येते. दोन्ही मुलांना गावातील शाळेत टाकल्याने खिचडी घरी येते. एका वेळेला खिचडी तिघे जण खाऊन कशीबशी भूक भागवितात, तर रात्रीला उपाशी झोपावे लागते. संघर्षातही मुलांचे पालनपोषण करण्याची जिद्द नरेशमध्ये आहे.दोन्ही मुले दिव्यांग असल्याने नरेश कुत्तरमारे यांना शेतात कामाला जाणे शक्य होत नाही. शासनाकडून त्यांना अधिक मानधन मिळावे, यासाठी प्रयत्न करू.- सुरेश निमकर, जि.प. सदस्य