शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

बकरीचोरांना रंगेहाथ पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 05:01 IST

बुलडाणा जिल्ह्यातील आरोपी सूरज हिवराळे, प्रदीप हिवराळे (दोघेही रा. चितोडा, ता खामगाव) व प्रमोद रामचंद्र निंबाळकर (रा. बाळापूर) हे तिघे एमएच ४७ सी ८८४७ या क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने ओंकारेश्वर येथून परत येत असताना त्यांनी गुडी गावातून दोन बकºया कारमध्ये कोंबल्या.

ठळक मुद्देचारचाकीही ताब्यात । हरिसाल येथील घटना

धारणी : मध्यप्रदेशातील गुडी गावातील दोन बकऱ्या कारमध्ये चोरून नेत असलेल्या तिघांना रंगेहाथ पकडण्यात आले. धारणी मार्गे परतवाडाकडे जात असताना हरिसाल येथे ग्रामस्थांनी त्या चोरांना कारसह पकडले.बुलडाणा जिल्ह्यातील आरोपी सूरज हिवराळे, प्रदीप हिवराळे (दोघेही रा. चितोडा, ता खामगाव) व प्रमोद रामचंद्र निंबाळकर (रा. बाळापूर) हे तिघे एमएच ४७ सी ८८४७ या क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने ओंकारेश्वर येथून परत येत असताना त्यांनी गुडी गावातून दोन बकºया कारमध्ये कोंबल्या. पळून जात असताना शेखपुरा येथील कलीमभाई यांना ते आढळून आले. त्यांनी धारणी येथील पोलीस सचिन होले यांना माहिती दिली. आरोपी देडतलाईहून धारणी येथे पोहोचले. तेथे पोलिस कर्मचारी सचिन होले यांनी तौसीफ कुरेशी, पप्पू पेंटर यांच्या मदतीने आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु आरोपींनी त्यांच्या अंगावर कार नेऊन तेथून पळ काढला. पोलीस कर्मचारी सचिन होले यांनी सहायक उपनिरीक्षक सुभाष सावरकर यांना हरिसाल गावाजवळ वनविभागाच्या गेटवर नाकाबंदी करून आरोपीला रोखण्याची सूचना दिली. आरोपी तेथे पोहचले; परंतु गेट बंद असल्याने त्यांनी तेथून कार मागे घेऊन हरिसाल गावाजवळच्या सिपना नदीच्या पुलाजवळ असलेल्या कच्च्या रस्त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. कार उभी करून आरोपीने जंगलाच्या मार्गाने पळ काढला. त्यावेळी हरिसाल येथील गावकऱ्यांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यांचेविरूद्ध गुन्हा नोंदविला.

टॅग्स :Thiefचोर