शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
2
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
3
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
4
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
5
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
6
Top Marathi News Live: नाशिक: भोंदू अशोक खरातविरुद्ध SITकडून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल
7
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
8
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
9
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
10
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
11
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
12
Travel : लडाखमध्ये इंजिन बंद असूनही गाड्या आपोआप चढतात डोंगर; या 'मॅग्नेटिक हिल'चं रहस्य काय?
13
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
14
भयंकर! फक्त एका लिंबूसाठी १२ वर्षांच्या मुलाची हत्या; संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक
15
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
16
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
17
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
18
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
19
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
20
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
Daily Top 2Weekly Top 5

दर्यापुरात नगराध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी

By admin | Updated: May 8, 2014 00:45 IST

ज्योत्स्ना चव्हाण यांचा अडीच वर्षांचा नगराध्यक्षपदाचा कार्यकाळ २८ जून रोजी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे जून महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार..

२८ जून रोजी संपणार कार्यकाळ : कोण मारणार बाजी? काँग्रेस की नगरसुधार!
 

दर्यापूर : ज्योत्स्ना चव्हाण यांचा अडीच वर्षांचा नगराध्यक्षपदाचा कार्यकाळ २८ जून रोजी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे जून महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार असून आतापासूनच नगराध्यक्ष पदासाठी मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. सर्वसाधारण महिलांसाठी हे पद आरक्षित आहे.
दर्यापूरच्या नगराध्यक्षपदी ज्योत्स्ना चव्हाण विराजमान आहेत. दर्यापूर नगरपरिषदेत काँग्रेसचे सात, नगरसुधार समिती आठ, भाजपा २, बहुजन विकास आघाडी ३ असे पक्षीय बलाबल आहे. मात्र, बहुजन विकास आघाडीच्या वंदना राजगुरे व मीना प्रांजळे यांनी वर्षभरापूर्वीच काँग्रेसमध्ये प्रवेश घेतल्याने काँग्रेसचे संख्याबळ नऊ झाले आहे. अडीच वर्षांपूर्वी ज्योत्स्ना चव्हाण यांनी काँग्रेसचे सात व नगरसुधार समितीची आठ मते घेऊन नगराध्यक्षपद मिळविले होते. त्यावेळी अडीच-अडीच वर्षांचा समझोता झाला होता. मात्र, सध्या नगरपरिषदेत काँग्रेस व नगरसुधार आघाडीत बिघाडी झाली आहे. त्यामुळे अडीच वर्षांपूर्वी काँग्रेस व नगरसुधार आघाडीत झालेला करार कायम राहणार की त्यात बदल होणार हे आताच सांगणे कठीण आहे. दर्यापूर नगरपरिषदेत एकूण दहा महिला नगरसेवक आहेत. काँग्रेसमध्ये पाच, नगरसुधारकडे चार, भाजपात एक महिला नगरसेवक आहे. अडीच वर्षांपूर्वी काँग्रेस व नगरसुधारमध्ये झालेल्या कराराची अंमलबजावणी न झाल्यास काँग्रेसला हे पद आपल्याकडेच कायम ठेवण्यासाठी आणखी दोन सदस्यांची मदत लागणार आहे. तर नगरसुधारला तीन सदस्यांची गरज भासणार आहे.