शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

अचलपूरसह राज्यात चार ‘एसएनसीयू’, बालमृत्यू रोखण्याची उपाययोजना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 17:40 IST

अचलपूर उपजिल्हा रुग्णालयासह राज्यात चार ठिकाणी एसएनसीयू अर्थात (सिक न्यूबॉर्न केअर युनिट) आजारी नवजात संगोपन युनिट कार्यान्वित केले जाणार आहे. आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी १४ सप्टेंबरला घोषणा केल्यानंतर लगेच १६ सप्टेंबरला सार्वजनिक आरोग्य विभागाने या युनिटच्या बांधकामाला मंजुरी दिली.

- प्रदीप भाकरे अमरावती,  दि. 17 - अचलपूर उपजिल्हा रुग्णालयासह राज्यात चार ठिकाणी एसएनसीयू अर्थात (सिक न्यूबॉर्न केअर युनिट) आजारी नवजात संगोपन युनिट कार्यान्वित केले जाणार आहे. आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी १४ सप्टेंबरला घोषणा केल्यानंतर लगेच १६ सप्टेंबरला सार्वजनिक आरोग्य विभागाने या युनिटच्या बांधकामाला मंजुरी दिली. ९३ व्या वित्त आयोगातून त्यासाठी ४ कोटी १० लाख रूपये खर्च केले जातील.राज्यात कमी दिवसांच्या, कमी वजनाच्या नवजात शिशुंची संख्या वाढली आहे. त्यांना अद्ययावत उपचार मिळावे व बालमृत्यू टाळता यावे, यासाठी राज्यात चार ठिकाणी ‘एसएनसीयू’च्या बांधकामासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने मंजुरी दिली. तेराव्या वित्त आयोगाकडून अर्भक मृत्यूदर कमी करण्यासाठी व प्राप्त अनुदानाच्या विनियोगासाठी धुळे, यवतमाळ, सांगली व अचलपूर येथील बांधकामासाठी ४.१० कोटी रूपयांना मंजुरी देण्यात आली आहे.राज्यात मेळघाटमध्ये सर्वाधिक बालमृत्यूची नोंद केली जाते. कुपोषणासह बालमृत्यूचा दर या भागात चढता आहे. अर्भक मृत्यूदर वाढत असताना आरोग्य यंत्रणेला मर्यादा आहेत. त्या पार्श्वभूमिवर अचलपूर येथील ‘एसएनसीयू’च्या बांधकामाला महत्त्व प्राप्त झाले आहे. मेळघाटातील धारणी व चिखलदरा तालुक्यातील अनेक रुग्ण तथा कुपोषितांवर अचलपूर येथे उपचार केले जातात. त्याअनुषंगाने अचलपूर येथील ‘एसएनसीयू’च्या बांधकामासाठी १.३५ कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत.

४१०.८८ लाखांतून काय?धुळे मेडिकल कॉलेजमधील एसएनसीयूच्या बांधकाम व नूतनीकरणासाठी ८६.६० लाख, यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एसएनसीयूच्या बांधकामासाठी १०९.७६ लाख, मेडीकल कॉलेज सांगली येथील एसएनसीयू वॉर्डाच्या नूतनीकरणासाठी ७६.४६ लाख तर अचलपूर येथील एसएनसीयूच्या नवीन बांधकामासाठी सर्वाधिक १३५ लाख रूपये मंजूर करण्यात आले आहेत.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलHealthआरोग्यMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार