शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

भेळेच्या सीलबंद पाकिटात पाच झुरळ

By admin | Updated: December 28, 2016 01:34 IST

स्थानिक राधानगरातील अनंत सुपर मार्केटमधून खरेदी केलेल्या पाकीटबंद कोरड्या ‘सोया भेळ’मध्ये तळलेले चार ते पाच झुरळ आढळून आले.

‘लाईट अँड फीट’चे उत्पादन : अन्न, औषधी प्रशासन विभागाकडे तक्रार अमरावती : स्थानिक राधानगरातील अनंत सुपर मार्केटमधून खरेदी केलेल्या पाकीटबंद कोरड्या ‘सोया भेळ’मध्ये तळलेले चार ते पाच झुरळ आढळून आले. या घटनेने पुन्हा एकदा खाद्यपदार्थांच्या विश्वासार्हतेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. याबाबत संबंधित ग्राहकाने मंगळवारी अन्न व औषधी प्रशासन विभागाकडे लेखी तक्रार करून संबंधित कंपनीवर कारवाईची मागणी केली आहे. गुजरातमधील अहमदाबादेतील ‘भास्कर फूड प्रॉडक्ट्स’ने या भेळची निर्मिती केली आहे. विस्तृत माहितीनुसार, गाडगेनगरातील रहिवासी मुकुंद गणपतराव बोकडे यांनी सोमवारी सायंकाळी राधानगरातील अनंत सुपर मार्केटमधून ‘लाईट एन फिट’चे ‘सोया भेळ’चे ४५ रूपयांचे पाकिट विकत घेतले. घरी जाऊन ते उघडले असता त्यात ५ ते ६ तळलेले झुरळ आढळून आले. झालेला प्रकार पाहून त्यांच्या पत्नीसह कुटुंबातील इतर सदस्यांना मळमळ होऊ लागली. ताबडतोब त्यांनी पुन्हा अनंत सुपर मार्केट गाठले आणि तेथील संचालकांच्या ही बाब लक्षात आणून दिली. झालेला प्रकार धक्कादायकच होता. त्यामुळे अनंत सुपर मार्केटच्या संचालकांनी ग्राहक मुकुंद बोकडे यांच्याशी चर्चा केली. सोया भेळची काही पाकिटे गुजरात राज्यातील अहमदाबादेतील कंपनीकडून बोलविल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत कंपनीकडे तक्रार केली जाईल, असेही संचालकांनी सांगितले. पश्चात मुकुंद बोकडे यांनी ‘लोकमत’ कार्यालय गाठून झालेला प्रकार कथन केला. ‘रघुवीर’च्या कचोरीत आढळलेली अळी आणि मनभरीच्या चिवड्यात तळलेली पाल आढळल्याचे प्रकरण ‘लोकमत’ने सातत्याने लावून धरले होते. यामुळे तळलेले झुरळ आढळलेले भेळचे पाकीट घेऊन मुकुंद बोकडे यांनी थेट 'लोकमत' कार्यालयाशी संपर्क साधला. या प्रकरणाची तक्रार अन्न व औषधी प्रशासन विभागाकडे करण्यात आली असून याबाबत कोणती कारवाई केली जाते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.