शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
2
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
3
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
4
Twisha Sharma : ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
5
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
6
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
7
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
8
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
9
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
10
सांगा..मुंबई कशी तुंबणार नाही! नालेसफाईवेळी नाल्यात सापडला चक्क रिक्षाचा सांगाडा अन् भलीमोठी लोखंडी कचरापेटी
11
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
12
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
13
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
14
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
15
ऑनलाइन कंपन्यांविरोधात औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप! १५ लाखांहून अधिक मेडिकल दुकाने बंद
16
Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाच्या पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
17
Twisha Sharma : 'लिगेचर रिपोर्ट' समोर आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट; पण संशयाची सुई अजूनही सासरच्यांवर!
18
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
19
'Welcome to Rome, my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
20
"...तर मीदेखील मेलो असतो", 'नटसम्राट'बद्दल नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटच्या जंगलात वणवा पेटला; वृक्ष, वन्यजीव आले संकटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 19:20 IST

Amravati : मेळघाटात उन्हाची तीव्रता वाढताच जंगलात वणवा पेटण्याच्या घटनांना सुरुवात झाली. अकोट वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या धारगड वनपरिक्षेत्रातील जंगल परिसरात भीषण आग लागल्याचे समोर आले.

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा :
मेळघाटात उन्हाची तीव्रता वाढताच जंगलात वणवा पेटण्याच्या घटनांना सुरुवात झाली. अकोट वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या धारगड वनपरिक्षेत्रातील जंगल परिसरात भीषण आग लागल्याचे समोर आले. यामध्ये मोठ्या प्रमाणात वनसंपदा जळून खाक झाली आहे. या आगीमुळेमेळघाटातील जैवविविधता धोक्यात आली असून वन्यप्राण्यांच्या जिवालाही मोठा धोका निर्माण झाला आहे.

दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसांत मेळघाट व्याघ्र प्रकल्प, प्रादेशिक विभाग आणि अकोट वन्यजीव विभागात वणवा लागण्याचे प्रमाण वाढते. धारणी-अकोट मार्गावरील हायपॉइंटनजीक रात्रीच्या सुमारास लागलेल्या आगीमुळे गवत, झुडपे व लहान वनस्पतींचे प्रचंड नुकसान झाले. विशेष म्हणजे, आगीच्या धुरामुळे वन्यप्राणी सुरक्षेसाठी मानवी वस्त्यांकडे किंवा इतर भागांत स्थलांतर करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

आगीचे सत्र सुरूच

वणवा रोखण्यासाठी दरवर्षी जाळरेषा कापण्यासह 'अंगारी' योजनेंतर्गत लाखोंचा खर्च केला जातो. यातून फायर लाईन, गस्त वाढवणे आणि जनजागृतीसारखी कामे केली जातात. मेळघाटात वारंवार लागणाऱ्या आर्गीमुळे या उपाययोजना आणि खर्चावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

नागरिकांना खबरदारीचे आवाहन

धारगडमधील आग विझवण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. दरम्यान, उन्हाळ्याच्या दिवसांत नागरिकांनी किंवा प्रवाशांनी जंगल परिसरात जाताना निष्काळजीपणा टाळावा. पेटती विडी, सिगारेट किंवा कोणत्याही ज्वलनशील वस्तू जंगलात फेकू नयेत, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Wildfire Engulfs Melghat Forest, Endangering Wildlife and Flora

Web Summary : A severe wildfire in Melghat's Dharagad forest threatens biodiversity and wildlife. Despite fire prevention efforts, the blaze caused significant damage. Negligence urged to prevent future fires.
टॅग्स :forestजंगलfireआगforest departmentवनविभागMelghatमेळघाटChikhaldaraचिखलदराAmravatiअमरावती