शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

चांदूर रेल्वेत ईव्हीएम सीलिंग प्रक्रिया पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:29 IST

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी स्थानिक प्रशासन सज्ज चांदूर रेल्वे - तालुक्यात २९ ग्रामपंचायतींची निवडणूक लढविणाऱ्या अंतिम उमेदवारांची यादी असलेल्या ईव्हीएम मशीनचे ...

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी स्थानिक प्रशासन सज्ज

चांदूर रेल्वे - तालुक्यात २९ ग्रामपंचायतींची निवडणूक लढविणाऱ्या अंतिम उमेदवारांची यादी असलेल्या ईव्हीएम मशीनचे सीलिंग शनिवारी सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत करण्यात आले. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या नावाची तयार करण्यात आलेली मतपत्रिका ईव्हीएम मशीनवर लावण्याचे काम उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. सदर प्रक्रिया निर्वाचन अधिकारी तथा तहसीलदार राजेंद्र इंगळे यांच्या देखरेखीत पार पडली.

यंत्रे सीलबंद करण्यापूर्वी सर्व उमेदवार, निवडणूक प्रतिनिधींना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. निवडणूक रिंगणात उभ्या असलेल्या सर्व उमेदवारांच्या यादीप्रमाणे मतदान यंत्रे सील करण्यात आली. या प्रक्रियेत निवडणुकीदरम्यान कुठलेच यंत्र बंद पडणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली. निवडणुकीकरिता ९२ मतदान केंद्रांवर प्रत्यक्ष मतदानकामी लागणारे ९२ व राखीव १० अशी मिळून एकूण १०२ मतदान यंत्रांची सीलिंग प्रक्रिया पूर्ण करून ती तहसील कार्यालयातील स्ट्राँगरूममध्ये ठेवण्यात आली व स्ट्राँग रूम पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली. सदर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरेसुद्धा लावण्यात आले. ही प्रक्रिया १५ टेबलवर ७० कर्मचाऱ्यांनी पार पाडली. या सर्व प्रक्रियेच्या वेळी निर्वाचन अधिकारी राजेंद्र इंगळे उपस्थित होते.