शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

एसटीचा संप मिटला तरी ना हाताला काम, ना दाम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2022 05:01 IST

सर्वच बस धावत नाहीत, शिवाय उकाडा वाढल्याने प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. परिणामी बसेसच्या फेऱ्याही कमीच आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्याच्या हाताला काम नसल्याने त्या दिवसाचा दामही मिळत नाही.  बसेस पाच महिन्यांपासून आगारातच थांबून असल्याने मेंटेनन्सचे काम सुरू होते.  त्यामुळे एप्रिल महिन्यात अनेक जणांच्या हाताला काम मिळाले नाही.  एसटीमध्ये काम नाही, तर दाम नाही, अशी पद्धत असल्याने काहींना संप मिटला तरी काम मिळत नाही. 

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राज्य परिवहन महामंडळाच्या सर्वच संपकरी कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. यामुळे बससेवाही पूर्वपदावर आली आहे. पाच महिन्यांपासून ही बस बंद असल्याने बसचा मेंटेनन्स निघत आहे. त्यामुळे सर्वच बस धावत नाहीत, शिवाय उकाडा वाढल्याने प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. परिणामी बसेसच्या फेऱ्याही कमीच आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्याच्या हाताला काम नसल्याने त्या दिवसाचा दामही मिळत नाही.  बसेस पाच महिन्यांपासून आगारातच थांबून असल्याने मेंटेनन्सचे काम सुरू होते.  त्यामुळे एप्रिल महिन्यात अनेक जणांच्या हाताला काम मिळाले नाही.  एसटीमध्ये काम नाही, तर दाम नाही, अशी पद्धत असल्याने काहींना संप मिटला तरी काम मिळत नाही. 

निम्म्या कर्मचाऱ्यांना मिळतो रोज काम

- अमरावती विभागातील अमरावती, बडनेरा, दर्यापूर, परतवाडा, चांदूर बाजार, मोर्शी, वरूड, चांदूर रेल्वे या आठ आगारांमध्ये जवळपास २३०० कर्मचारी आहेत.
- न्यायालयाच्या आदेशानंतर सर्वच कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. कर्मचारी कामावर हजर झाल्याने बसही धावू लागल्या आहेत. मात्र, बसचे काम निघत असल्याने काहींना काम मिळत नव्हते.

 एसटी कर्मचारी संघटना म्हणतात.... 

संपामुळे एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले नाही. आता संप मिटला अन् कर्मचारी कामावर आले. कामावर हजर असताना त्यांना ड्युटी मिळाली नाही, तर वेतन दिले जात नाही. कर्तव्यावर हजर झाल्यास वेतन मिळावे.
- बाळासाहेब राणे, प्रादेशिक सहसचिव, एसटी कामगार सेना

पाच महिन्यांपासून संपामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन नाही. यामुळे आर्थिक संकटात कर्मचारी सापडले होते. आता संप मिटला आहे. कर्मचारी कामावर परतले आहेत. परंतु कामावर आल्यावर काम मिळाले नाही, तर वेतन मिळत नाही. ते द्यावे. 
- मोहित देशमुख, विभागीय सचिव, एसटी कामगार संघटना

 

टॅग्स :ST Strikeएसटी संप