शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

आठ विद्यार्थी रोमानिया हंगेरीमध्ये सुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2022 05:01 IST

युक्रेन येथे वैद्यकीय शिक्षणासाठी अमरावती जिल्ह्यातील ११ विद्यार्थी गेले होते. तेथे युद्धस्थिती होताच दोघे भारतात परतले. यानंतर बुधवारी रोमानियाची राजधानी बुखारेस्ट येथून विमानाने स्वराज पुंड हा विद्यार्थी दुपारी दिल्लीत परतला आहे. त्याला गुरुवारी नागपूरला विमानाने पाठविण्यात येणार आहे. आम्ही त्याला आणायला जात असल्याचे त्याची आई अर्चना पुंड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : युक्रेनमधून आठ विद्यार्थी सीमापार हंगेरी व रोमानियामध्ये दाखल झाले आहेत. या ठिकाणी ते सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय एक विद्यार्थी बुधवारी दुपारी दिल्लीला पोहोचला व गुरुवारी नागपूरला व नंतर अमरावतीला येणार असल्याची माहिती त्याच्या परिवाराने दिली. उर्वरित विद्यार्थ्यांच्या मायदेशी परतण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.युक्रेन येथे वैद्यकीय शिक्षणासाठी अमरावती जिल्ह्यातील ११ विद्यार्थी गेले होते. तेथे युद्धस्थिती होताच दोघे भारतात परतले. यानंतर बुधवारी रोमानियाची राजधानी बुखारेस्ट येथून विमानाने स्वराज पुंड हा विद्यार्थी दुपारी दिल्लीत परतला आहे. त्याला गुरुवारी नागपूरला विमानाने पाठविण्यात येणार आहे. आम्ही त्याला आणायला जात असल्याचे त्याची आई अर्चना पुंड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. दरम्यान प्रणव फुसे, तुषार गंधे, तनिष्क सावंत, वृषभ गजभिये, प्रणव भारसाकळे, मोहम्मद नोमान महम्मद रिझवान,  कुणाल कावरे व नेहा लांडगे यांनी युक्रेनची सीमा पार करून लगतच्या रोमानिया व हंगेरी या देशात पोहोचले असल्याचे नियंत्रण कक्षाने सांगितले. काही विद्यार्थ्यांशी व त्यांच्या पालकांशी संपर्क साधला असता, त्यांनी याविषयी पुष्टी केली. आम्ही सुरक्षित आहोत, दूतावासाचे व येथील नागरिक, एनजीओंचे सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.ईस्टमधून वेस्ट युक्रेनचा १५०० किमीचा प्रवासईस्ट युक्रेनमधून वेस्ट युक्रेनमध्ये जाण्यासाठी १५०० किमी व ३३ तासांचा प्रवास करावा लागला. त्यानंतर बुधवारी आम्ही हंगेरीत पोहोचलो आहे. या प्रवासात केवळ शेवटच्या स्टेशनवर ब्रेडची व्यवस्था झाली. बुडापेस्ट या शहरात दूतावासातर्फे आमची एका हॉटेलमध्ये व्यवस्था करण्यात आलेली आहे. लवकरच आम्ही मायदेशी पोहोचू, असे प्रणव भारसाकळे यांनी सांगितले.

पालकमंत्र्यांचा स्वराजशी संवादयुक्रेनमधून रोमानिया व तेथून भारतात परतलेल्या स्वराज पुंड याच्यासोबत पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी संवाद साधला व त्याच्या प्रवासासह तेथील परिस्थिती जाणून घेतली. यासोबतच भाजपच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी (दिघडे) यांनीदेखील त्याची चौकशी करून भारतात परतल्याबाबत त्याचे स्वागत केल्याचे सांगण्यात आले.

 

 

टॅग्स :warयुद्धStudentविद्यार्थी