शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
2
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
3
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
4
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
5
मध्यमवर्ग त्याग करायला तयार आहेच, पण डझनभर गाड्यांचा ताफा...; जयंत पाटील यांची टिप्पणी
6
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
7
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
8
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
9
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सौंदर्यासाठी नाही, तर मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; नवरा झाला हैवान, बायकोचा घेतला जीव
11
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
12
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
13
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
14
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
15
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
16
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
17
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
18
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
19
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
20
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
Daily Top 2Weekly Top 5

तहसील कार्यालयात आता ई-आॅफीस प्रणाली

By admin | Updated: January 6, 2015 22:53 IST

तहसील ते जिल्हाधिकारी व थेट विभागीय आयुक्त कार्यालय असा संपूर्ण विभाग ई-आॅफिस प्रणालीच्या सहाय्याने पेपर लेस करण्यासाठी महसूल विभागाने एक पाऊल पुढे टाकले आहे

मोहन राऊ त - अमरावती
तहसील ते जिल्हाधिकारी व थेट विभागीय आयुक्त कार्यालय असा संपूर्ण विभाग ई-आॅफिस प्रणालीच्या सहाय्याने पेपर लेस करण्यासाठी महसूल विभागाने एक पाऊल पुढे टाकले आहे. आता प्रत्येक तहसीलदार, नायब तहसीलदारांच्या टेबलवर संगणक राहणार आहे़ याद्वारे कामकाजात सुसूत्रता येणार आहे़
प्रशासकीय कामकाजात एखाद्या पत्राला उत्तर देण्यापूर्वी ४० ते ४५ विविध स्तरातून व डझनभर नोंदवह्यांतून हे पत्र प्रवास करते़ या कागदाच्या साधारणत: १० ते १५ प्रती काढली जातात़ एकाच पत्राची प्रत विविध विभागातील कपाटात जमा ठेवण्यात येते़ कोणत्याही प्रकारची कागदपत्रे शोधण्यासाठी २० मिनिटे लागतात़ काही कागदपत्रे कधीच मिळत नाहीत़ अनेक वेळा ही कागदपत्रे गहाळ होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाला मिळते़ त्यामुळे महसूल विभागाने ई-आॅफिस सेवा सुरू करण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वी घेतला होता़ आता ही प्रणाली अमरावती विभागातील पाच जिल्ह्यात राबविण्यासाठी युध्द पातळीवर प्रयत्न सुरू आहे़ अमरावती जिल्ह्यात १४ तहसील कार्यालये आहेत़
यवतमाळ १६, वाशीम ६, बुलढाणा १४, अकोला ६ असे या जिल्ह्यात तालुके आहेत़ ई-आॅफिस हा वेब बेस असलेल्या विविध संगणक प्रणालीचा संच आहे़ कार्यालयात प्राप्त टपालापासून निर्गमित होणाऱ्या पत्राचा प्रवास ई-आॅफिसमध्ये डिजिटल होणार आहे़ त्याचबरोबर स्थायी आदेश संचिता, सेवा पुस्तिका, रजा, कार्यालयीन सभा, नियोजन असे विविध सात प्रक्रियांचे संच ई-आॅफिस या एकाच वेब अ‍ॅप्लिकेशनमध्ये सामावलेले आहेत़
ई-आॅफिसमुळे कागदपत्रविरहीत कार्यालयांचे कामकाज चालून यामध्ये पारदर्शकता व गतिमानता येणार आहे़ या प्रणालीमुळे कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या टेबलावरील फाईलचे गठ्ठे नाहिसे होऊन कार्यालयात स्वच्छता व नीटनिटकेपणा दिसणार आहे़ ही ई-अॉफिस प्रणाली ५६ तालुके व पाच जिल्ह्यांत राबवून थेट विभागीय आयुक्त कार्यालयाशी जोडली जाणार आहेत़