शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरातच डांबरी रस्त्याची झाली माती

By admin | Updated: December 30, 2016 00:49 IST

सुमारे साडेतीन कोटी रूपये खर्चून साकारण्यात आलेले वडाळी येथील बांबूवन उद्घाटनाच्या प्रतीक्षेत

वडाळी बांबूवनातील प्रकार : रस्त्यावर चुरी, डांबरीकरण उखडले अमरावती : सुमारे साडेतीन कोटी रूपये खर्चून साकारण्यात आलेले वडाळी येथील बांबूवन उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असताना गतवर्षी निर्माण करण्यात आलेल्या डांबरीकरण केलेल्या रस्त्याची माती झाली आहे. यागंभीर प्रकरणी वरिष्ठांकडे तक्रार नोंदविण्यात आली असतानाही याकडे वनाधिकारी दुर्लक्ष करून संपूर्ण प्रकरण गुंडाळण्याची तयारी करीत असल्याचे चित्र आहे. बांबू वनउद्यान हे अमरावतीच्या वैभवात भर घालणारे आहे. नव्या वर्षात १ जानेवारी २०१७ रोजी या उद्यानाचे उद्घाटन पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती आहे. बांबू वनउद्यानाचीकाही किरकोळ कामे झाली नसली तरी ते युद्धस्तरावर करण्यासाठी वनाविभाग अहोरात्र प्रयत्न करीत आहे. नक्षत्र, पगोडा बांधकामातही मुरुमाचा वापर बांबूवनातील रस्त्यांची पुरती वाट लागली असताना नक्षत्र, पगोडा बांधकामातही गिट्टीऐवजी मुरुम वापरल्याची तक्रार करण्यात आली आहे. ८० एमएम आकारची गिट्टी न वापरता मुरुम वापरुन बांधकाम करण्यात आले आहे. बांधकामाची खोलात जाऊन तपासणी केल्यास बरेच तथ्य बाहेर येईल, यात दुमत नाही. तक्रारीनंतरही चौकशी का नाही ? वडाळी येथील बांबूवनातील रस्ते निर्मितीत गिट्टीऐवजी मुरुम वापरल्याची तक्रार वलय पिसे नामक व्यक्तीने केली आहे. रस्त्याचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याचे पाहणीअंती दिसून येते. गंभीर स्वरुपाची तक्रार दिली असताना अद्याप वरिष्ठांनी याप्रकरणाची चौकशी करु नये, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वडाळी बांबू वनोद्यानात रस्ते निर्मितीत निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. सहायक वनसंरक्षक राजेंद्र बोंडे यांच्याकडे चौकशीची जबाबदारी सोपविली असून अहवालानंतर कारवाईची दिशा ठरविली जाईल. - हेमंत मीना, उपवनसंरक्षक, अमरावती