शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

पोहरा जंगलाला भर हिवाळ्यात वणवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 05:01 IST

वडाळी वनपरिक्षेत्रांतर्गत पोहरा वर्तुळातील पोहरा बीटमध्ये ३३ कोटीतील ५० हजार सागरोपांची लागवड असलेले रोपवन शुक्रवारी दुपारी पेटले. यात ५ हजार  सागाची मोठी झाडे खाक झाली. वनकर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने आग विझविली. परंतु, तीव्र हवेमुळे सुमारे पाच हेक्टर रोपवन वणव्याच्या विळख्यात आले. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास भुंबर यांचे मार्गदर्शन घेण्यात आले.

ठळक मुद्दे१५ दिवसांपूर्वीही रोपवनाला आग

घातपाताचा संशय

अमोल कोहळेलोकमत न्यूज नेटवर्कपोहरा बंदी : वनविभागाकडून आटोकाट प्रयत्न करूनही पोहरा जंगलात वणव्याला हिवाळ्यातच प्रारंभ झाला. पोहरा बीटच्या वनखंड क्रमांक ४२ मधील ५० हजार साग रोपवनातील साडेबारा हजार झाडे ऐन हिवाळ्यात शुक्रवारी रात्री धडधडा पेटली. वन्यप्राणी जिवाच्या आकांताने सैरावैरा पळत सुटले. अखेर वनकर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने दोन तासांत आग विझविली. यातील आरोपी हुडकून काढण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले आहेत. वडाळी वनपरिक्षेत्रांतर्गत पोहरा वर्तुळातील पोहरा बीटमध्ये ३३ कोटीतील ५० हजार सागरोपांची लागवड असलेले रोपवन शुक्रवारी दुपारी पेटले. यात ५ हजार  सागाची मोठी झाडे खाक झाली. वनकर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने आग विझविली. परंतु, तीव्र हवेमुळे सुमारे पाच हेक्टर रोपवन वणव्याच्या विळख्यात आले. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास भुंबर यांचे मार्गदर्शन घेण्यात आले. आग विझविताना चार ब्लोअर मशीनचा वापर करण्यात आला. दोन तासांच्या महत्प्रयासाने ही आग आटोक्यात आली. ही आग हेतुपुरस्सर लावल्याचा अंदाज वनविभागाने वर्तविला असून, आरोपी हुडकून काढण्याचे आदेश देण्यात आले. वडाळी वनपाल श्याम देशमुख, वनरक्षक डी.ओ. चव्हाण, चंद्रशेखर चोले, वनमजूर, संरक्षण मजूर यांनी परिश्रम घेतले.  

१५ दिवसांपूर्वीही रोपवनाला आगपंधरा दिवसांपूर्वी पोहरा वर्तुळातील परसोडा बिटमधील रोपवनाला आग लागली. त्या आगीत दोन हेक्टर रोपवन जळाल्याने मिश्र रोपांचे नुकसान झाले, तर शुक्रवारी पाच हेक्टर सागाच्या रोपवनाला आगीने विळख्यात घेतले. उन्हाळ्यात जंगलाला आगी लागण्याच्या घटना घडतात. मात्र, आता हिवाळ्यात विनाहंगामी आगीच्या घटनांनी घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. 

 

टॅग्स :forestजंगलfireआग