शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
4
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
5
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
6
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
7
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
8
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
9
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
10
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
11
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
12
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
13
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
14
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
15
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
16
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
17
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
18
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
19
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
20
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
Daily Top 2Weekly Top 5

माधान येथे लोकसहभागातून नाला खोलीकरण

By admin | Updated: June 30, 2015 00:28 IST

तालुक्यातील संत गुलाबराव महाराजांचे माधान या गावातील गावकऱ्यांनी एकत्रित येऊन लोकसहभागातून गावाच्या...

नवा आदर्श : ६० हजार रूपयांची लोकवर्गणी जमाचांदूरबाजार : तालुक्यातील संत गुलाबराव महाराजांचे माधान या गावातील गावकऱ्यांनी एकत्रित येऊन लोकसहभागातून गावाच्या मध्यातील नाल्याचे खोलीकरण केले. यासाठी लागणारा निधी गावातील लोकांनी लोकवर्गणीतून जमा केला. हा एक नवा आदर्श तालुक्यात दिशादर्शक ठरणारा आहे. माधानवासीयांचा हा आदर्श तालुक्यातील सर्वच नागरिकांनी घेतला तर जलयुक्त शिवार अभियान कार्यक्रम १०० टक्के यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही.संत श्री गुलाबराव महाराजांनी आपले शेतीविषयक विचार मांडताना येणाऱ्या काळात कोणता शेतकरी टिकेल, या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले होते की, पावसाच्या पाण्यावर अवलंबून न राहता थोड्याफार पाण्याची व्यवस्था करून जो आपली शेती पिकवेल तोच शेतकरी भविष्यात शेतीत टिकवेल. महाराजांच्या याच वचनातून प्रेरणा घेऊन माधान येथील गावकऱ्यांनी लोकसहभागातून जलसंधारणाचे नाला खोलीकरणाचे महत्त्वाचे काम हाती घेतले आहे. तसेच या गावाला गांधीवादी विचारसरणीच्या सेवाभावी ताराबेन मश्रुवाला यांच्या जनसेवेचा वारसाही लाभला आहे. या मातीत रुजलेल्या त्यांच्या लोकसेवा वारसाचाही गावकऱ्यांनी यासाठी उपयोग करून घेतला.गावकऱ्यांच्या या भावना ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचल्यानंतर स्वत: ग्रामपंचायत कार्यालयही या लोकसहभागात समाविष्ट झाले. लोकांकडून जमा झालेल्या लोकवर्गणीत भ्रष्टाचार होऊ नये यासाठी ग्रामपंचायत रीतसर सात नंबरची पावतीही दानदात्याला देण्यात येऊन या कामावरील जमा-खर्चाचा हिशेब ठेवण्याची जबाबदारी गावकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयावर सोपविली आहे, अशा रीतीने गावकऱ्यांनी एकत्रित येऊन नाला खोलीकरणाच्या निमित्ताने जलशिवार योजनेचा अभिनव शुभारंभ शासनाची कोणतीही मदत न घेता सुरू करून एक आदर्श तालुक्यातील नागरिकांना घालून दिला. गावकऱ्यांच्या या स्तुत्य उपक्रमाला स्थानिक उपविभागीय अधिकारी शरद जावळे यांनी सदिच्छा भेट देऊन या उपक्रमाबाबत त्यांचे अभिनंदन केले.सदर उपक्रम राबविण्याकरिता उपसरपंच दिनेश देशमुख, कस्तुरबा माधान संस्थेचे सचिव बाळासाहेब पटवर्धन, सरपंच अश्विनी धावडे, बाळासाहेब पाटेकर, विजय रेवळकर, रवी सर्वटकर, मोहन धावडे, एस. एम. मोहोड, रावसाहेब भागवत, कृष्णराव कोल्हे, अनिरुद्ध मोहोड यांनी पुढाकार घेतला. या नाला खोलीकरणाच्या कामासाठी गावकऱ्यांनी एकत्रित येऊन ६० हजार रुपये एवढा निधी लोकवर्गणीतून जमा केला, हे विशेष. (शहर प्रतिनिधी)जलयुक्त शिवार अभियानाला प्रतिसादशासनाने सुरू केलेल्या जलयुक्त शिवार अभियानाला येथे उत्तम प्रतिसाद मिळत आहे. येथील नागरिकांची सहकार्याची भावना असून जलयुक्त शिवार योजना त्यांच्या मदतीने १०० टक्के यशस्वी होण्याच्या मार्गावर असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.