शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळी कांद्याने रडविले; लागवडीचा खर्च वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 14:25 IST

Amravati News चांदूर बाजार तालुक्यातील कांदा लागवड अंतिम टप्प्यात आली आहे. फेब्रुवारी दुसऱ्या आठवड्यात कांदा लागवड संपणार आहे. मात्र, यावर्षी लागवडीचा खर्च वाढल्याने उन्हाळी कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणले आहे.

ठळक मुद्देकांदा लागवड अंतिम टप्प्यात

 लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : चांदूर बाजार तालुक्यातील कांदा लागवड अंतिम टप्प्यात आली आहे. फेब्रुवारी दुसऱ्या आठवड्यात कांदा लागवड संपणार आहे. मात्र, यावर्षी लागवडीचा खर्च वाढल्याने उन्हाळी कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणले आहे. त्यात आता कांद्याला काय भाव मिळणार, याची चिंता शेतकरी वर्गाला लागली आहे.

             तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांदा पिकाची लागवड करण्यात येते. काजळी, देऊरवाडा, माधान, कोदोरी, जसापूर, पिंपरी पूर्णा, थुगाव, निंभोरा या भागांत सर्वाधिक कांदा लागवड होते. या भागात ज्या शेतकऱ्यांकडे स्वत:ची शेती नाही, त्यांनीदेखील कांदा लागवडीसाठी शेती लागवणने घेतले आहे. दरवर्षी शेतकरी कांदा लागवडीसाठी ५०० ते ६०० रुपये पायलीने बीज खरेदी करतात. मात्र, यंदा कांद्या बियाणाच्या एका पायलीसाठी दोन हजार रुपये द्यावे लागले आहेत. त्यामुळे कांद्याच्या लागवड खर्चात मोठी वाढ झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांनी यंदा कांद्याला कमीत कमी १५०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

देशातून कांदयाची निर्यात सुरू राहिली, तर कांद्याला अपेक्षित भाव निश्चित मिळू शकतो, असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. कांद्याला यंदाचा लागवडीचा खर्च ५० हजारांच्या घरात आहे. मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न उभा झाला आहे. खत, फवारणी, रासायनिक औषधींच्या वाढलेल्या दरामुळेदेखील शेतकरी हैराण आहेत. विशेष म्हणजे, उच्च शिक्षण घेऊन नोकरीच्या तयारीत असणाऱ्या अनेक युवकांनी कांदा लागवड करून आपला कल शेतीकडे वळविला आहे.

निर्यात धोरण आडमुठे

जेव्हा शेतकऱ्यांच्या घरात कांदा होता तेव्हा शासनाने निर्यात बंद केली. जेव्हा कांदा संपला तेव्हा निर्यात सुरू करण्यात आली. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा रोष वाढला आहे. शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना लागवड खर्च निघणेही कठीण झाले आहे. यामुळे उन्हाळी कांदा लागवडीने यंदा शेतकऱ्यांना रडू आणल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

-------------

टॅग्स :onionकांदा