शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

काँगे्रसमधील बेबनाव उघड,२१ नगरसेवकांची दांडी

By admin | Updated: August 17, 2016 00:02 IST

माजी आमदार रावसाहेब शेखावत यांच्या सत्कार सोहळ्याला तब्बल २१ काँग्रेशी नगरसेवकांनी दांडी मारली.

शेखावतांची टोलेबाजी : ज्येष्ठ नेत्यांचा सन्मान अमरावती : माजी आमदार रावसाहेब शेखावत यांच्या सत्कार सोहळ्याला तब्बल २१ काँग्रेशी नगरसेवकांनी दांडी मारली. त्यामुळे शहर काँग्रेसमधील अंतर्गत बेबनाव चव्हाट्यावर आला आहे. येथील विमलाबाई देशमुख सभागृहात रावसाहेब शेखावत यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त काँगेस कार्यकत्यांनी रविवारी सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली असली तरी शहर काँग्रेसच्या कार्यकारिणीतील सदस्यांसह नगरसेवकांनी फिरवलेली पाठ दखलपात्र होती.महापालिकेत पंजावर निवडून आलेले २५ नगरसेवक आहेत. शिवाय वसंत साऊरकर आणि अमोल ठाकरे हे दोघे स्वीकृत सदस्य आहेत. या अधिकृत २७ नगरसेवकांपैकी उपमहापौर शेख जफर, सुगनचंद गुप्ता, आसिफ तवक्कल, भारत चव्हान, नुरखॉ मौजदार खॉ या पाच काँग्रेशी नगरसेवकांसह अपक्ष निवडून आलेल्या नूतन भुजाडे यांचीच उपस्थिती होती. बबलू शेखावत, विलास इंगोले यांच्यासह २१ काँग्रेशी नगरसेवकांनी मारलेली दांडी, काँग्रेसमधील शहराध्यक्षपदाचा वाद किती विकोपाला पोहचलाय याचा प्रत्यय देणारी ठरली.माझा पूर्ण वेळ विकासकामे करण्यात गेला. त्यामुळे विकासकामावरच माझा फोकस होता. पाच वर्षे भरपूर काम कलीत. मात्र कामाचे ढोल वाजवता आले नाही. त्यामुळे २०१४ च्या निवडणुकीत माझे ढोल वाजल्याची बोच रावसाहेबांनी बोलून दाखवली. न जाने बादलोमे क्या साजीश हुई ,मुझ गरिब का घर मिट्टी का था ,मेरेही घर बारीश हुई.असा शेर एैकवत सवांना सर्व पदे दिली आनि वरुन म्हणतात की रावसाहेबांना राजकारण समजत नाही.हा माझ्या स्वभावाचा झायदा घेणे नव्हे काय,असा सवाल रावसाहेबानी आपल्या सत्काराला उत्तर देताना उपस्थित केला.'ते' म्हणजे बंडीखालचे श्वानमहापालिकेतील एकहाती सत्तेमुळे काहींनी काँग्रेसचाच उपमर्द चालविला आहे. आपल्यामुळेच महापालिकेत काँग्रेसची सत्ता आल्याचे दिवास्वप्न अनेकांना पडते.अशानची तुलना बंडीखाली चालणाऱ्या कुत्र्यांशीच केली पाहिजे, अशा जहाल शब्दांत रावसाहेबांनी पक्षातील बंडखोरांची खिल्ली उडविली. शेखावत यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त रिपाइंच्या ज्येष्ठ नेत्या कमलताई गवई, राष्ट्रवादीचे नेते शरद तसरे, माजी मंत्री यशवंतराव शेरेकर,माजी आ.नरीशचंद्र ठाकरे यांच्यासह भैरवसिंग शेखावत आणि सैयद अजिजुल हसन यांचा सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर उपमहापौर शेख जफर, रावसाहेब शेखावत, मंजिरी शेखावत, सुगनचंद गुप्ता, आसिफ तवक्कल, भारत चव्हान, नुरखॉ मोैजदार खॉ, अक्षय भुयार, राजा बागडे आणि माजी शहराध्यक्ष विश्वासराव देशमुख उपस्थित होते. महापालिकेतील काही काँग्रेशी नगरसेवकांवर त्यांनी टीकास्त्र सोडले. विश्वासराव देशमुखांनी कधीही माझ्या आई-वडिलांचा अपमान केला नाही. महापालिका निवडणुकीचे आव्हान परतवून लावण्यासाठी विश्वासराव देशमुख यांच्याच नेतृत्वाची गरज असल्याचे ते म्हणाले.