शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
5
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
6
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
7
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
8
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
9
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
10
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
11
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
12
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
13
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
14
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
15
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
16
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
18
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
19
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
20
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस आयुक्तांकडे करणार तक्रार

By admin | Updated: August 26, 2014 23:04 IST

विकास विद्यालयातील मुख्याध्यापक व शिक्षकांनी संगनमत करुन बनावट कागदपत्रांच्या आधारे १३ विद्यार्थांचा शाळेत बोगस प्रवेश केल्याची तक्रार गाडगेनगर पोलिसांकडे प्राप्त झाली.

शिक्षणाधिकाऱ्यांची माहिती : विकास विद्यालयातील बनावट पटसंख्येचे प्रकरणअमरावती : विकास विद्यालयातील मुख्याध्यापक व शिक्षकांनी संगनमत करुन बनावट कागदपत्रांच्या आधारे १३ विद्यार्थांचा शाळेत बोगस प्रवेश केल्याची तक्रार गाडगेनगर पोलिसांकडे प्राप्त झाली. परंतु याप्रकरणी पोलिसांकडून कारवाई न झाल्याने ‘लोकमत’ने मंगळवारी ‘उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या तक्रारीला पोलिसांचा खो’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताने पोलीस व शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी दोषींवर कारवाई झाली नसल्याचे पाहून शिक्षणाधिकारी सी. आर. राठोड हे बुधवारी थेट पोलीस आयुक्त सुरेश मेकला यांच्याकडे याप्रकरणाची तक्रार करणार आहेत.विकास विद्यालयातील घोटाळा चौकशीदरम्यान स्पष्ट झाल्याने शिक्षणाधिकारी राठोड यांनी याप्रकरणी गैरअर्जदारांविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे निर्देश उपशिक्षणाधिकारी मिलिंद राजगुरे यांना दिले होते. राजगुरे यांनी १३ मार्च २०१४ रोजी याप्रकरणी २६४ पानांची लेखी तक्रार पुराव्यासह गाडगेनगर पोलीस ठाण्यात दाखल केली. परंतु याप्रकरणी पोलिसांनी अद्याप कुठलीही कारवाई न केल्याने पाणी मुरत असल्याचा आरोप उपशिक्षणाधिकारी मिलिंद राजगुरे यांनी केला. याप्रकरणाची माहिती ‘लोकमत’ला प्राप्त होताच मंगळवारी विकास विद्यालयासंदर्भातील घबाड उघड करणारे वृत्त प्रकाशित करण्यात आले. हे वृत्त प्रकाशीत होताच शिक्षण व पोलीस विभाग खडबडून जागे झाले. उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या तक्रारीची गाडगेनगर पोलिसांनी दखल न घेतल्याने स्वत: शिक्षणाधिकारी राठोड हे पोलीस आयुक्त सुरेश मेकला यांच्याकडे तक्रार दाखल करणार आहेत. याप्रकरणी पोलीस आयुक्त सुरेश मेकला काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.