शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भानखेडा मार्गावर चार बिबट असल्याचा दावा

By admin | Updated: January 23, 2015 00:45 IST

शिकारीच्या शोधात वन्यप्राणी शहराच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे चित्र आहे. भानखेडा मार्गावर एक-दोन नव्हे तर चक्क चार बिबट असल्याचा दावा वनविभागाने केला आहे.

अमरावती : शिकारीच्या शोधात वन्यप्राणी शहराच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे चित्र आहे. भानखेडा मार्गावर एक-दोन नव्हे तर चक्क चार बिबट असल्याचा दावा वनविभागाने केला आहे. यातील दोन बिबट वन विभागाच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. जंगलात जाताना नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन वनविभागामार्फत करण्यात आले आहे. वडाळी वनपरिक्षेत्रांतर्गत बिबट, हरिण, निलगाय, रानडुक्कर अशा विविध वन्यप्राण्यांचा संचार आहे. विशेषत: भानखेडा मार्गावर चार बिबट्यांचा मुक्तसंचार असल्याचे नागरिकांनी बघितले आहे. बिबट शिकारीच्या शोधात शहराच्या दिशेने वाटचाल करीत आहे. दोन दिवसांपूर्वी भानखेडा मार्गावर म्हशीची शिकार करून तिला नजीकच्या शेतात नेऊन फस्त केल्याचे दृष्य वनविभागाच्या कॅमेऱ्यात कैद झाले. म्हशीचे उर्वरित मांस भक्षण्याकरिता दोन बिबट घटनास्थळी पोहोचल्याचे गुरूवारी ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाले. वडाळी वनपरिक्षेत्रात चार ते पाच बिबट असल्याची नोंद यापूर्वीच झाली आहे. मोकाट कुत्र्यांची शिकार करण्यासाठी बिबट शहराकडे येत असल्याचा दावा वन अधिकाऱ्यांनी केला आहे. यातील एक बिबट काही दिवसांपूर्वी विद्यापीठ ते रहाटगाव परिसरातही आढळून आला. वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी विशेष पथक तयार केले आहे. चांदूररेल्वे, भानखेडा मार्गावर या बिबट्यांचा मुक्तसंचार असून नागरिकांनी जंगलात प्रवेश करताना सावधगिरी बाळगावी असे आवाहन वडाळीचे वनपरिक्षेत्र अधिकारी पी. के. लाकडे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)