शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नगरपरिषद निवडणुकीसाठी दीड कोटींचे बजेट

By admin | Updated: February 27, 2016 00:14 IST

जिल्ह्यातील नऊ नगपरिषदांच्या आगामी निवडणुकीसाठी सुमारे १ कोटी ४१ लाख ८६ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

निवडणुकीची पूर्वतयारी : प्रशासनाचे नियोजन सुरूअमरावती : जिल्ह्यातील नऊ नगपरिषदांच्या आगामी निवडणुकीसाठी सुमारे १ कोटी ४१ लाख ८६ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये जिल्ह्यातील नऊ नगरपरिषदांचा समावेश आहे. जिल्ह्यातील नगरपरिषदांचे प्रभाग रचनेचे काम पूर्ण करून गुगल ड्राईव्हवर केएसएल फाईलद्वारे अपलोड केले आहे. जिल्ह्यातील ९ नगरपरिषदांचा डिसेंबर २०१६ व जानेवारी २०१७ मध्ये कार्यकाळ संपुष्टात येत आहे. यासाठी काही महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. त्यामुळे राजकीय घडामोडीही सुरू झाल्या आहेत. प्रशासनानेही निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. या तयारीचा नुकताच निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांच्याकडून आढावा घेण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यात नगरपरिषदांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जास्तीत जास्त कामे संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत. सोबत मोबाईल अँड्राईड अप्लीकेशनचा पहिल्यांदाच वापर केला जाणार आहे. निवडणुका पेपरलेस करण्याचा प्रयत्न प्रशासनाने या माध्यमातून सुरू केला आहे. जिल्ह्यातील ९ नगरपरिषदेच्या निवडणुका होणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने प्रशासनाने प्रशासकीय तयारी सुरू केली आहे. याबाबत प्रगतीची माहिती राज्य निवडणूक आयोगाला द्यावी लागणार आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदार यादी अद्ययावतीकरणाचे काम सुरू झाले आहे. याबाबत नगरपरिषद विभागाचे अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही. (प्रतिनिधी)