शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याआधीच मोठी कारवाई, रेल्वे स्टेशनवरच बंदी असलेल्या बियाण्यांचा साठा जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 19:28 IST2026-04-25T19:24:05+5:302026-04-25T19:28:08+5:30

पोलिसांनी तब्बल ८ लाख ६ हजार रुपये किमतीचे अनधिकृत एचटीबीटी (HTBT) कापूस बियाणे जप्त केले असून, याप्रकरणी एकाला बेड्या ठोकल्या आहेत.

Big action before it reaches farmers, stock of banned seeds seized at railway station itself | शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याआधीच मोठी कारवाई, रेल्वे स्टेशनवरच बंदी असलेल्या बियाण्यांचा साठा जप्त 

शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याआधीच मोठी कारवाई, रेल्वे स्टेशनवरच बंदी असलेल्या बियाण्यांचा साठा जप्त 

अमरावती: शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या आणि शासनाने प्रतिबंधित केलेल्या बियाण्यांच्या काळ्या बाजाराविरोधात अमरावती शहर पोलीस आणि कृषी विभागाने मोठी कारवाई केली. रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचून पोलिसांनी तब्बल ८ लाख ६ हजार रुपये किमतीचे अनधिकृत एचटीबीटी (HTBT) कापूस बियाणे जप्त केले असून, याप्रकरणी एकाला बेड्या ठोकल्या आहेत.

​प्रतिबंधित कापूस बियाण्यांची मोठी खेप अमरावतीत रेल्वेने येणार होती. या माहितीच्या आधारे विभागीय कृषी सहसंचालक आणि अमरावती शहर गुन्हे शाखेच्या पथकाने २५ एप्रिल  रोजी रेल्वे स्टेशन परिसरात पाळत ठेवली. 

यावेळी एक व्यक्ती संशयास्पदरित्या गोणी घेऊन जाताना दिसला. पोलिसांनी त्याला हटकले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, सखोल झडती घेतली असता त्या गोणीत बंदी असलेल्या बियाण्यांचे घबाडच हाती लागले.

​आरोपीला अटक, पोलिसांनी काय काय जप्त केलं?

​व्हाईट गोल्ड ५ जी कॉटन सीड: ४७३ पाकिटे (किंमत ४,७३,००० रु.)

​धुम २ सीड: ३०६ पाकिटे (किंमत ३,०६,००० रु.)

​हायब्रीड सीड: २६ पाकिटे (किंमत २६,००० रु.)

​या कारवाईत चेतन सुखलाल ठाकरे (रा. मंगरुळ दस्तगीर, ता. धामणगाव) याला अटक करण्यात आली आहे, तर विशाल प्रकाश भोईर (रा. नंदुरबार) हा आरोपी सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

​वरिष्ठांच्या मार्गदर्शनात धडाकेबाज कामगिरी

​ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, उपायुक्त गणेश शिंदे, सागर पाटील आणि गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. यामध्ये कृषी विभागाचे गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक संजय पाटील आणि त्यांच्या टीमचाही मोलाचा वाटा आहे.

Web Title : रेलवे स्टेशन पर 8 लाख के प्रतिबंधित बीज जब्त, एक गिरफ्तार

Web Summary : अमरावती पुलिस और कृषि विभाग ने रेलवे स्टेशन पर 8.06 लाख रुपये के प्रतिबंधित एचटीबीटी कपास के बीज जब्त किए, एक गिरफ्तार। सूचना पर कार्रवाई करते हुए, उन्होंने अवैध बीजों के साथ संदिग्ध को पकड़ा, जिससे कालाबाजारी का प्रयास विफल हो गया। एक अन्य आरोपी फरार है। इस ऑपरेशन में पुलिस और कृषि निरीक्षक शामिल थे।

Web Title : Banned seeds worth ₹8L seized at railway station, one arrested.

Web Summary : Amravati police and agriculture dept seized banned HTBT cotton seeds worth ₹8.06 lakhs at the railway station, arresting one. Acting on a tip, they caught the suspect with the illegal seeds, thwarting a black market attempt. Another accused is absconding. The operation involved police and agricultural inspectors.