अहमदाबाद एक्स्प्रेस, मुंबई मेलच्या फेऱ्या वाढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 05:00 AM2020-09-14T05:00:00+5:302020-09-14T05:00:33+5:30

हावडा-मुंबई मेल (क्रमांक ०२८१०) ही गाडी २२ सप्टेंबरपासून रेल्वे स्थानकावर मंगळवार, गुरुवार, रविवार या दिवशी रवाना होईल. मुंबई- हावडा मेल (क्रमांक ०२८०९) २४ सप्टेंबरपासून बडनेरा रेल्वे स्थानकावरून गुरुवार, शनिवार व मंगळवार असे तीन दिवस धावेल. अहमदाबाद ते हावडा (गाडी क्रमांक ०२८३३) १८ सप्टेंबरपासून शुक्रवार, सोमवार व बुधवार असे तीन दिवस बडनेरा रेल्वे स्थानकाहून रवाना होईल.

Ahmedabad Express, Mumbai Mail rounds increased | अहमदाबाद एक्स्प्रेस, मुंबई मेलच्या फेऱ्या वाढल्या

अहमदाबाद एक्स्प्रेस, मुंबई मेलच्या फेऱ्या वाढल्या

Next
ठळक मुद्देआठवडयातून तीन दिवस धावणार : खुर्दा रोड ते अहमदाबाद एक्स्प्रेस सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असला तरी रेल्वेने प्रवासी गाड्याची वाहतूक हळूहळू रुळावर करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यापूर्वी आठवड्यातून एक दिवस धावणारी हावडा-मुंबई मेल, हावडा-अमदाबाद एक्स्प्रेस या दोन्ही गाड्या आता आठवड्यातून तीन दिवस सुरू राहतील. फेऱ्यांमधे वाढ करून प्रवाशांना दिलासा देण्यात आला.
हावडा-मुंबई मेल (क्रमांक ०२८१०) ही गाडी २२ सप्टेंबरपासून रेल्वे स्थानकावर मंगळवार, गुरुवार, रविवार या दिवशी रवाना होईल. मुंबई- हावडा मेल (क्रमांक ०२८०९) २४ सप्टेंबरपासून बडनेरा रेल्वे स्थानकावरून गुरुवार, शनिवार व मंगळवार असे तीन दिवस धावेल. अहमदाबाद ते हावडा (गाडी क्रमांक ०२८३३) १८ सप्टेंबरपासून शुक्रवार, सोमवार व बुधवार असे तीन दिवस बडनेरा रेल्वे स्थानकाहून रवाना होईल. हावडा ते अहमदाबाद (क्रमांक ०२८३४) गाडी बडनेरा रेल्वे स्थानक येथून बुधवार, सोमवार व शनिवार असे तीन दिवस धावेल.
ओखा से खुर्दा रोड (क्रमांक ०८४०२) ही गाडी आठवड्यातून एक दिवस बडनेरा रेल्वे स्थानकावरुन १७ सप्टेंबरपासून गुरुवारी रवाना होईल. अमदाबाद ते भुवनेश्वर (क्रमांक ०८४०६) ही गाडी आठवड्यातून एक दिवस १४ सप्टेंबरपासून दर शनिवारी बडनेराहून रवाना होईल तसेच भुवनेश्वर ते अहमदाबाद (क्रमांक ०८४०५) ही गाडी १६ सप्टेंबरपासून दर गुरुवारी रवाना होईल. गांधीधाम ते पुरी (क्रमांक ०२९७३) ही गाडी आठवड्यातून एक दिवस बडनेरा स्थानकवरून गुरुवारी रवाना होईल तसेच पुरी ते गांधीधाम (क्रमांक ०२९७४) ही गाडी आठवड्यातून एक दिवस रविवारी रवाना होईल.
खुर्दा रोड ते अहमदाबाद (क्रमांक ०२८४३) ही गाडी आठवड्यातून चार दिवस धावणार आहे. १३ सप्टेंबरपासून बडनेराहून रविवार, बुधवार, शुक्रवार व शनिवार असे चार दिवस ही गाडी जाणार आहे. अहमदाबाद ते खुर्दा रोड (क्रमांक ०२८४४) ही गाडी बडनेरा रेल्वे स्थानकावरून १५ सप्टेंबरपासून मंगळवार, शुक्रवार, रविवार व सोमवार असे चार दिवस रवाना होईल, अशी माहिती बडनेरा रेल्वे स्थानकाचे मुख्य खंड वाणिज्य निरीक्षक शरद सयाम यांनी दिली. आरक्षण तिकीट घेऊनच प्रवास करावा लागेल, कोरोना नियमांचे पालन करून प्रवाशांना प्रवास करता येईल, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Ahmedabad Express, Mumbai Mail rounds increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे