समृद्धी महामार्गावरून रेती तस्करी करणाऱ्यांवर कारवाई; हायवा ट्रकसह १४ ब्रास कन्हान रेती जप्त

By प्रदीप भाकरे | Updated: May 15, 2026 14:24 IST2026-05-15T14:23:33+5:302026-05-15T14:24:28+5:30

Amravati : एकीकडे समृद्धी महामार्गावर वाहने सुसाट धावत असताना, दुसरीकडे याच मार्गावरून रात्रीच्या अंधारात रेतीची छुपी तस्करी करणाऱ्यांचे मनसुबे पोलिसांनी उधळून लावले आहेत.

Action against sand smugglers on Samruddhi Highway; 14 tons of sand seized along with a highway truck | समृद्धी महामार्गावरून रेती तस्करी करणाऱ्यांवर कारवाई; हायवा ट्रकसह १४ ब्रास कन्हान रेती जप्त

Action against sand smugglers on Samruddhi Highway; 14 tons of sand seized along with a highway truck

अमरावती : एकीकडे समृद्धी महामार्गावर वाहने सुसाट धावत असताना, दुसरीकडे याच मार्गावरून रात्रीच्या अंधारात रेतीची छुपी तस्करी करणाऱ्यांचे मनसुबे पोलिसांनी उधळून लावले आहेत. अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या ‘क्लीन स्वीप’ मोहिमेअंतर्गत धामणगाव रेल्वे तालुक्यातील तळेगाव दशासर पोलिसांनी १५ मे रोजी पहाटे ही मोठी कारवाई केली आहे.
             
१५ मे च्या पहाटे तळेगाव दशासर पोलिसांचे पथक गस्तीवर होते. पहाटे ३:३० च्या सुमारास गुप्त बातमीदाराने दिलेल्या टिपनुसार पोलिसांनी समृद्धी महामार्गावर सापळा रचला. तथा समोरून येणारा एमएच २७ डीझेड २११४ क्रमांकाचा टाटा हायवा ट्रक अडवला. पोलिसांनी जेव्हा ट्रकची झडती घेतली, तेव्हा त्यात विनापरवाना (विना रॉयल्टी) तब्बल १४ ब्रास कन्हान रेती आढळून आली. ५५ लाखांचा ट्रक आणि १ लाख ४० हजारांची रेती, असा एकूण ५६ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जागीच जप्त केला.

दोघांविरूद्ध एफआयआर

या प्रकरणी ट्रक चालक शरीफ बुद्धू लुचईवाले (वय ४४, रा. गवळीपुरा, अमरावती) आणि ट्रक मालक खाजा सलमान अब्दुल रहमान (रा. करीमनगर, अमरावती) यांच्यावर पर्यावरण संरक्षण अधिनियम आणि मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेतन कदम, अपर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल पवार व एलसीबीप्रमुख किरण वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव दशासरचे ठाणेदार किरण औटे, अमर काळे, पवन अलोने, पंकज शेडे आणि गौतम गवळे यांच्या पथकाने केली.

Web Title : समृद्धि महामार्ग पर रेत तस्करी का भंडाफोड़; ट्रक, रेत जब्त

Web Summary : पुलिस ने समृद्धि महामार्ग पर रेत तस्करी का भंडाफोड़ किया, ₹56.4 लाख मूल्य के ट्रक और 14 ब्रास रेत जब्त की। अमरावती में पर्यावरण संरक्षण और मोटर वाहन अधिनियमों के तहत दो व्यक्तियों पर मामला दर्ज किया गया।

Web Title : Sand Smuggling on Samruddhi Highway Busted; Truck, Sand Seized

Web Summary : Police busted sand smuggling on the Samruddhi Highway, seizing a truck and 14 brass of sand worth ₹56.4 lakhs. Two individuals were booked under environmental protection and motor vehicle acts in Amravati.