शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम विदर्भात आपत्तीमुळे ५५ व्यक्तींचा मृत्यू; ३७७ जनावरे मृत

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: September 10, 2024 18:37 IST

Amravati : अतिवृष्टीमुळे पश्चिम विदर्भातील ७६७ गावे अन् २०३३ कुटुंबे बाधित

अमरावती : पश्चिम विदर्भातील सर्व तालुक्यांनी पावसाची सरासरी पार केलेली आहे. सततचा पाऊस, अतिवृष्टी या आपत्तीमुळे  ५५ नागरिकांचा मृत्यू झालेला आहे. शिवाय लहान-मोठी ३७७ जनावरे मृत झालेली आहेत. ४३०८ घरांची पडझड झालेली आहे. विभागात ३७ तालुक्यांतील ३७ तालुके ७७० गावांना या आपत्तीचा फटका बसला. यामुळे २०३३ कुटुंबे बाधित झाल्याचा विभागीय आयुक्तांचा अहवाल आहे.

अमरावती विभागात १ जून ते १० सप्टेंबर या कालावधीत ६६२.५ मिली पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात ७९१ मिमी पावसाची नोंद झाली. ही ११९.४ टक्के सरासरी आहे. गतवर्षी याच तारखेला ८६.२ टक्के पाऊस झाला होता. सततचा पाऊस, अतिवृष्टी यामुळे नदी-नाल्यांना आलेल्या पुरात ३९ व्यक्ती वाहून गेल्या आहेत. तर वीज कोसळून १० जणांचा मृत्यू झालेला आहे. याशिवाय अंगावर भिंत कोसळल्याने ३ व इतर कारणांनी ३ व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे. यामधील ३४ प्रकरणांत आतापर्यंत १.३६ कोटींचे सानुग्रह अनुदान देण्यात आलेले आहे.

आपत्तीमुळे मोठी दुधाळ ८८, लहान दुधाळ २२४, ओढकाम करणारी ५५ व ओढकाम करणारी लहान १० असे एकूण ३७७ जनावरांचा मृत्यू झालेला आहे. याबाबत पशुपालकांना सानुग्रह अनुदान देण्यात आलेले आहे. 

४३०८ घरांची पडझडया आपत्तीमध्ये ६३ घरांची पूर्णत: पडझड झालेली आहे, तर ७८० घरांची अंशत: पडझड झाली. शिवाय ३४६० कच्च्या घरांची पडझड झालेली आहे. यामध्ये ५ झोपड्या, तर १३७ गोठे नष्ट झाले आहेत. याबाबत स्थानिक प्रशासनाद्वारा सर्व्हे करण्यात येत असून, पात्र प्रकरणात महसूल विभागाद्वारा सानुग्रह अनुदान देण्यात येत आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील पिकांचे सर्वाधिक नुकसान

  • अतिवृष्टीमुळे विभागात २,५२,८३९ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले, तर नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे १४७९ हेक्टरमधील पिके खरडली गेली, तर पुरामुळे १६३ हेक्टरमध्ये गाळ साचल्याने पिकांचे नुकसान झालेले आहे.
  • अतिवृष्टीमुळे यवतमाळ जिल्ह्यात १,७५,६२७ हेक्टर, अमरावती ५,८११ हेक्टर, अकोला ५१,०५६, वाशिम १०,४१२ हेक्टर व बुलडाणा जिल्ह्यात ९,९३३ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे.
टॅग्स :floodपूरVidarbhaविदर्भAmravatiअमरावती