शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

२१ अर्ज रद्द, २०७ उमेदवार कायम

By admin | Updated: September 29, 2014 22:52 IST

जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघात सोमवारी अर्ज छाननीदरम्यान २१ उमेदवारी अर्ज विविध कारणांनी रद्द ठरविण्यात आले. तर दोघांनी माघार घेतली. आता २०७ उमेदवार निवडणूक रिंगणात

अमरावती : जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघात सोमवारी अर्ज छाननीदरम्यान २१ उमेदवारी अर्ज विविध कारणांनी रद्द ठरविण्यात आले. तर दोघांनी माघार घेतली. आता २०७ उमेदवार निवडणूक रिंगणात कायम आहेत. १ आॅक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. मोर्शी मतदारसंघात एकूण २८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. आज सोमवारी छाननी दरम्यान ज्ञानेश्वर माधव राऊत यांचा अर्ज रद्द ठरविण्यात आला. बसपचा ‘एबी’ फॉर्म त्यांनी अर्जासोबत जोडलेला नव्हता. तसेच सोमवारी मंजुषा खांडेकर, अनिता मसाने या दोन उमेदवारांनी अर्ज मागे घेतला.धामणगाव रेल्वे मतदारसंघात ३० उमेदवारांनी ४२ अर्ज दाखल केले होते. यातील प्रमोद तऱ्हेकर व अविनाश पाठक यांचा उमेदवारी अर्ज छाननी दरम्यान रद्द करण्यात आला. या दोन्ही उमेदवारांचे प्रत्येकी दोन अर्ज होते. आता ४० उमेदवारी अर्ज राहिले आहेत.दर्यापूर मतदारसंघात सोमवारी दोन उमेदवारांचे अर्ज छाननी दरम्यान रद्द करण्यात आले. यात पी.टी पाटील, विद्यासागर वानखडे या दोघांचा समावेश आहे. खंडारे यांनी संपत्तीचे विवरण दाखल न केल्याने वानखडे यांनी बसपचा ‘एबी’ फार्म दाखल न केल्याने या दोघांचेही उमेदवारी अर्ज रद्द ठरविण्यात आले. आता २९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.मेळघाट मतदारसंघात सोमवारी दोन उमेदवारांचा बी फॉर्म न आल्याने उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला. बालकराम जांबेकर (बसप) व रवी रामू पटेल (भाजप) यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला.