शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
6
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
7
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
8
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
9
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
10
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
11
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
12
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
13
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
14
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
15
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
16
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
17
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
18
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
19
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
20
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
Daily Top 2Weekly Top 5

114 कोटींचा हरभरा शेतकऱ्यांच्या घरीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2022 05:00 IST

खासगीमध्ये आधारभूत किमतीपेक्षा कमी भावाने विक्री होत असल्याने २६,३२१ शेतकऱ्यांनी नाफेड करिता ऑनलाइन नोंदणी केली. त्याच्या तुलनेत १८,७६८ शेतकऱ्यांचा हरभरा २३ मेपर्यंत खरेदी करण्यात आला. अद्याप ७,५५३ शेतकऱ्यांच्या २,१८,१७० क्विंटल हरभऱ्याची खरेदी व्हायची असताना मुदतपूर्व पोर्टल बंद करण्यात आले. त्यामुळे ५,२३० या हमी भावाप्रमाणे किमान ११४ कोटींचा हरभरा शेतकऱ्यांच्या घरी पडून आहे.

गजानन मोहोड
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :   खरीप हंगाम तोंडावर असतांना हरभऱ्याची शासकीय खरेदी बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. नाफेडचे पोर्टल मुदतपूर्व बंद करण्यात आल्याने  ऑनलाइन नोंदणी केलेल्या ७,५५३ शेतकऱ्यांच्या २,१८,१७० क्विंटल हरभऱ्याची खरेदी बाकी आहे. याचा फायदा घेत खासगी बाजरामध्ये व्यापाऱ्यांनी भाव पाडल्यानेे किमान ११४ कोटींचा हरभरा शेतकऱ्यांच्या घरी पडून आहे.
खासगीमध्ये आधारभूत किमतीपेक्षा कमी भावाने विक्री होत असल्याने २६,३२१ शेतकऱ्यांनी नाफेड करिता ऑनलाइन नोंदणी केली. त्याच्या तुलनेत १८,७६८ शेतकऱ्यांचा हरभरा २३ मेपर्यंत खरेदी करण्यात आला. अद्याप ७,५५३ शेतकऱ्यांच्या २,१८,१७० क्विंटल हरभऱ्याची खरेदी व्हायची असताना मुदतपूर्व पोर्टल बंद करण्यात आले. त्यामुळे ५,२३० या हमी भावाप्रमाणे किमान ११४ कोटींचा हरभरा शेतकऱ्यांच्या घरी पडून आहे.
शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीचे संरक्षण मिळावे, याकरिता शासन खरेदी केंद्रे जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहेत. यामध्ये व्हीसीएमएफच्या अमरावती, अंजनगाव सुर्जी, चांदूर बाजार, धामणगाव रेल्वे, मोर्शी, वरूड व येवदा या केंद्रांवर १३,८८९ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. त्याच्या तुलनेत ९,२७० शेतकऱ्यांच्या २.३० लाख क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली. जिल्ह्यातील अद्याप ४,६१९ शेतकऱ्यांची १.२६ लाख क्विंटल हरभरा खरेदी बाकी आहे. 

डीएमओ केंद्रांवर ९२ हजार क्विंटल खरेदी बाकी
डीएमओच्या अचलपूर,जयसिंग अचलपूर, चांदूर रेल्वे, दर्यापूर, धारणी, खल्लार, नांदगाव खंडेश्वर, नेरपिंगळाई व तिवसा केंद्रांवर १२,४३२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. त्या तुलनेत १२,९११ शेतकऱ्यांचा २.२४ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. अद्याप २,९३४ शेतकऱ्यांचा ९२ हजार क्विंटल हरभरा खरेदी प्रतीक्षेत आहे.

जिल्हा उपनिबंधकांचे सरव्यवस्थापकांना पत्र
बाजार समित्यांमध्ये हमीभावापेक्षा एक हजार रुपयांपर्यंत कमी भावाने मागणी होत आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले व लोकप्रतिनिधींकडून सातत्याने विचारणा होत असल्याने जिल्हा उपनिबंधकांनी उर्वरित शेतकऱ्यांची खरेदी करण्याची मागणी मार्केटिंग फेडरेशनच्या सरव्यवस्थापकडे गुरुवारी केली.

 

टॅग्स :FarmerशेतकरीMarket Yardमार्केट यार्ड