शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
2
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
3
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
4
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
5
मध्यमवर्ग त्याग करायला तयार आहेच, पण डझनभर गाड्यांचा ताफा...; जयंत पाटील यांची टिप्पणी
6
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
7
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
8
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
9
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सौंदर्यासाठी नाही, तर मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; नवरा झाला हैवान, बायकोचा घेतला जीव
11
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
12
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
13
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
14
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
15
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
16
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
17
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
18
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
19
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
20
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
Daily Top 2Weekly Top 5

अकोला शहराचा पाणीपुरवठा मजीप्राकडे

By admin | Updated: July 19, 2014 01:31 IST

११ कोटी ८४ लाख मंजूर ; मनपाच्या सर्वसाधारण सभेत शिक्कामोर्तब.

अकोला : गत अनेक दिवसांपासून केवळ चर्चाच सुरू असलेला शहराचा पाणीपुरवठा महाराष्ट्र जीवन प्राधीकरणकडे सुपूर्द करण्याचा विषय अखेर शुक्रवारी मार्गी लागला. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने पाणीपुरवठा मजीप्राकडे हस्तांतरीत करण्याच्या प्रस्तावास मंजूरी दिली. या निर्णयामुळे पाणीपुरवठय़ामध्ये वारंवार उद्भवणार्‍या समस्यांपासून अकोलेकरांना मुक्तता मिळण्याची अपेक्षा आहे. याशिवाय शहर बस वाहतुकीसाठी इतर पर्यायांचा शोध घेण्यासह महत्त्वपूर्ण विषय शुक्रवारच्या सभेत मार्गी लागले.
महापालिका सभागृहात प्रशासनाने सादर केलेल्या ३४ पैकी ३३ विषयांना एकमुखाने मंजुरी देण्यात आली.
तब्बल सात महिन्यानंतर मनपाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात सर्वसाधारण सभेचे आयोजन १८ जुलै रोजी करण्यात आले. शहरात मूलभूत सुविधा व विकास कामांसाठी शासनाकडून प्राप्त ३0 कोटींसह विविध योजनांचे अनुदान चर्चेअभावी पडून होते. यामुळे शहराचा विकास ठप्प झाल्याची ओरड सर्वत्र सुरू होती. आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी महापालिकेची सूत्रे हातात घेतल्यानंतर नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. त्या पृष्ठभूमीवर सर्वसाधारण सभेत नेमके काय निर्णय होतात, याकडे संपूर्ण अकोलावासीयांचे लक्ष लागून होते. प्रशासनाने सभागृहात ३४ विषयांची लांबलचक यादी सादर केली. यामध्ये सुरुवातीलाच शहराची पाणीपुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे हस्तांतरित करून देखभाल दुरुस्तीसाठी मजीप्राला ११ कोटी ८४ लाख निधी देण्याचा ऐतिहासिक ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. शहराची लोकसंख्या वाढली असून, मनपाकडे जलप्रदाय विभागात पुरेसे तांत्रिक कर्मचारी नाहीत. सदर अनुदान मजीप्राला एकदाच द्यावे लागणार असल्याची माहिती शहर अभियंता अजय गुजर यांनी दिली. पाणीपुरवठय़ासंदर्भात नगरसेवकांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी पाच नगरसेवकांची समिती गठित करण्याची सूचना आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केली. प्रभागातील हातपंप, सबर्मसिबल पंपाची कामे मात्र नगरसेवकांच्या अखत्यारित असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. मूलभूत सुविधा व विकास कामांसाठी मनपाला प्राप्त ३0 कोटींच्या अनुदानातून मजीप्राला ११ कोटी ८४ लाख दिल्यानंतर १ कोटी ८0 लाखातून प्रशासनाने कामे सुचवली. तर उर्वरित १७ कोटी ३६ लाख निधीचे नगरसेवकांना समान वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी २६ कोटीच्या समान वाटपावरून सत्तापक्ष व विरोधकांमध्ये कलगीतुरा रंगला होता.