शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

मतदान करा, औषधींवर सूट मिळवा!

By admin | Updated: October 15, 2014 01:34 IST

टक्केवारी वाढविण्यासाठी केमिस्ट अँण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचा निर्णय.

सचिन राऊत /अकोलामतदानाची टक्केवारी मोठय़ा प्रमाणात वाढावी व लोकशाहीच्या या मतदान यज्ञामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे यासाठी जिल्हय़ातील प्रत्येक औषध दुकानावर औषधांवर घसघशीत सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मतदान करून शाईचे बोट दाखविल्यास १५ ते २0 ऑक्टोबर या कालावधीत अकोला जिल्हा केमिस्ट अँण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या सर्व औषधी दुकानांवरून औषध घेणार्‍यांना १५ ते २0 टक्के सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला.मतदानाची टक्केवारी वाढल्यास योग्य उमेदवार विधानसभेत जाण्याची अपेक्षा आहे, त्यामुळे मतदारसंघाचा विकास, त्या भागातील प्रलंबित प्रश्न, समस्या मार्गी लावण्याचा ध्यास असलेल्या आणि जनसामान्यांसाठी काहीतरी करणार्‍या उमेदवारांची निवड व्हावी, यासाठी मतदान महायज्ञामध्ये सर्वांना सहभागी करण्यासाठी अकोला जिल्हा केमिस्ट अँण्ड ड्रगिस्ट असोसिएशनने पुढाकार घेतला आहे. राज्याच्या विधानसभेसाठी बुधवारी मतदान होणार आहे. त्यामुळे केमिस्ट अँण्ड ड्रगिस्ट असोसिएशनने सोमवारी सायंकाळी तातडीची बैठक घेऊन जिल्हय़ातील सर्व औषधी दुकानावरून औषध घेणार्‍यांना सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. मतदान करून शाईचे बोट दाखविणार्‍यांना जिल्हय़ातील कुठल्याही औषधी दुकानावर १५ ते २0 ऑक्टोबर या कालावधीत १५ ते २0 टक्के सूट देण्यात येणार आहे. यासाठी एक कार्ड तयार करण्यात आले असून, हे कार्ड दवा बाजारातील केमिस्ट अँण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या कार्यालयामधून घेतल्यानंतर रुग्णांना औषधी दुकानांवरून १५ ते २0 टक्के सूट देण्यात येणार आहे. जिल्हय़ातील ७00 औषधी दुकानांवरून ही सूट देण्यात येणार असून, यामध्ये केमिस्ट अँण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या सर्वच औषधी दुकानांवरून ही सूट देण्यात येणार आहे.