शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
2
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
3
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
4
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
5
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
6
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
7
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
8
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
9
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
10
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
11
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
12
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
13
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
14
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
15
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
16
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
17
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
18
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
19
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
20
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ७२५ प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरूम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 12:18 IST

या प्रकल्पात सहभागी होण्यासाठी शाळांना १0 आॅक्टोबरपर्यंत नोंदणी करावी लागणार आहे.

- नितीन गव्हाळे

 अकोला: शालेय शिक्षण विभागांतर्गत बालभारती व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या समन्वयाने राज्यातील ७२५ स्थानिक स्वराज्य संस्था, अनुदानित उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरूम प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी प्रत्येक तालुक्यातून दोन शाळा निवडण्यात येणार आहेत. या प्रकल्पात सहभागी होण्यासाठी शाळांना १0 आॅक्टोबरपर्यंत नोंदणी करावी लागणार आहे.शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासोबतच, विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून शालेय शिक्षण विभागांतर्गत प्राथमिक व माध्यमिकच्या निवडक शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरूम प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पामध्ये राज्यातील सर्वच तालुक्यांमधून अर्ज मागविले आहेत. व्हर्च्युअल क्लासरूम प्रकल्पात सहभागी होण्यासाठी शाळांना या अटी पूर्ण कराव्या लागणार आहेत. शाळांमध्ये बसविण्यात येणाऱ्या साधनांची सुरक्षितता, राज्यस्तरावरून व्हर्च्युअल क्लासरूमद्वारे प्रक्षेपित होणाºया तासिकांचे, प्रशिक्षण वर्गांचे शाळेमधील विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी प्रक्षेपणात सहभाग घ्यावा लागेल. व्हर्च्युअल क्लासरूमची साधने, टीव्ही, सुस्थितीतील व उत्तम बैठक व्यवस्था असलेली वर्गखोली, शाळेचे वर्षभराचे संपूर्ण वीज बिल भरलेले आवश्यक राहील. शाळेची पटसंख्या १00 असावी. या अटी पूर्ण करणाºया शाळांची व्हर्च्युअल क्लासरूम प्रकल्पासाठी निवड करण्यात येईल. प्रकल्पात सहभागी होण्यासाठी इच्छुक शाळांनी डब्लूडब्लूडब्लू. रिसर्च.नेट या संकेतस्थळावर अर्ज करावा. अर्ज करणाºया शाळांमध्ये भौतिक सुविधा, विद्युत पुरवठा, चांगल्या वर्गखोल्या आहेत की नाहीत, याची पाहणी गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख करण्यात येणार आहे. त्यानंतरच त्या शाळांमध्ये हा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे.शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता, भौतिक सुविधांच्या दृष्टिकोनातून राज्यातील ७२५ शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरूम प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पात सहभागी होण्यासाठी शाळांनी अर्ज करावेत.-डॉ. समाधान डुकरे, प्राचार्यजिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था

 

टॅग्स :SchoolशाळाAkolaअकोलाEducation Sectorशिक्षण क्षेत्र