शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दोन आरोपींना दोन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा

By admin | Updated: July 18, 2014 00:45 IST

अकोला शहरातील वाशिम बायपास पोलिस चौकीवर कार्यरत पोलिस कर्मचार्‍यास मारहाण करणे भोवले.

अकोला - जुने शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील वाशिम बायपास येथील पोलिस चौकीवर कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचार्‍यास मारहाण करणार्‍या दोन आरोपींना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. सी. बावस्कर यांच्या न्यायालयाने गुरुवारी दोन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. यासोबतच दोन्ही आरोपींना एक-एक हजार रुपये दंड ठोठावण्यात आला असून दंड न भरल्यास आणखी एक महिना सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जुने शहर पोलस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले प्रवीण भाऊराव सोनोने हे वाशिम बायपास येथील पोलिस चौकीवर कार्यरत असताना २५ जुलै २0११ रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास त्यांच्या चौकीत सिद्धार्थ प्रभाकर तायडे व प्रशांत प्रल्हाद कांबळे या दोघांनी धुडगूस घातला होता. यावेळी प्रवीण सोनोने यांनी त्यांना विरोध केला असता दोन्ही आरोपींनी त्यांना मारहाण केली. तसेच दुचाकीची तोडफोड करून पोलिस खात्याची वाकीटॉकी तोडून टाकली होती. सोनोने यांना मारहाण सुरू असतांनाच त्यांचे सहकारी लायक खान यांनी घटनास्थळावर येऊन आरोपींच्या तावडीतून प्रवीण सोनोने यांची सुटका केली. त्यानंतर सोनोने यांनी जुने शहर पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रशांत कांबळे व सिद्धार्थ तायडे या दोघांविरुद्ध कलम ३३३, ३५३, ५0४, ४२७ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल केला. न्यायालयामध्ये खटला सुरू असताना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश पी.सी. बावस्कर यांच्या न्यायालयाने या प्रकरणामध्ये सात साक्षीदार तपासले. त्यानंतर दोन्ही पक्षाची बाजू ऐकून घेतल्यानंतर आरोपी प्रशांत कांबळे व सिद्धार्थ तायडे या दोघांना कलम ३३३ मध्ये दोन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. सोबतच एक हजार रुपये दंड ठोठावला असून, दंड न भरल्यास आणखी एक महिना सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणामध्ये सरकार पक्षातर्फे अँड. पी. पी. नागरे, यांनी तर आरोपीतर्फे अँड. नौरंगाबादी यांनी कामकाज पाहिले.