शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

तीन तलाक: अकोला जिल्ह्यातील पहिला गुन्हा बाळापुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 14:08 IST

पत्नीला तोंडी तीन तलाक देणाºया पतीविरुद्ध मुस्लीम महिला विवाह अधिकार संरक्षण कायदा २०१९ चे कलम ४ नुसार बाळापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

बाळापूर (अकोला): वाद मिटविण्यासाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीत पत्नीला तोंडी तीन तलाक देणाºया पतीविरुद्ध मुस्लीम महिला विवाह अधिकार संरक्षण कायदा २०१९ चे कलम ४ नुसार बाळापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. अकोला जिल्ह्यात तीन तलाक कायद्यानुसार गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच घटना आहे.बाळापूर शहरातील राहणाºया फिर्यादी महिलेचे २०१३ मध्ये मंगरुळपीर येथील मोहंमद जाफर मोहंमद तस्लिम याच्यासोबत लग्न झाले होते. त्यांना तीन अपत्ये आहेत. विवाहितेला तिचा पती, सासू, सासरे, नणंद, किरकोळ कारणावरून तसेच दिसायला चांगली नाही म्हणून तिचा सतत शारीरिक व मानसिक छळ करीत होते. तसेच सतत तिला टोचून बोलत होते. पती मोहंमद जाफर हा तू मला नको, मी दुसरे लग्न करतो, तू निघून जा, असे नेहमी बोलत होता व शिवीगाळ करीत होता. या त्रासाला कंटाळून ती मुलासह माहेरी बाळापूर येथे राहायला आली. २१ आॅगस्ट दोन्हीकडील मंडळी त्यांच्यातील वाद मिटविण्यासाठी बाळापूरला आले होते; परंतु या बैठकीत वाद न मिटता त्यांच्यामध्ये पुन्हा वाद झाला. यावेळी फिर्यादी महिलेस तिच्या पतीने तीन वेळा तलाक म्हणून घटस्फोट दिला. विवाहितेच्या फिर्यादीवरून बाळापूर पोलिसांनी पतीसह सासरा मोहंमद तस्लिम, सासू अलिया निसा, नणंद शाहीन परवीन तसेच नातेवाईक अब्दुल गणी अब्दुल अजीज यांच्याविरुद्ध कलम ४९८ (अ), ५०४, ३४, भादंवि मुस्लीम महिला विवाह अधिकार संरक्षण कायदा २०१९ नुसार तत्काळ गुन्हा दाखल केला. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रोहिणी सोळंके, पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक नौशाद करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)

 

टॅग्स :Akolaअकोलाtriple talaqतिहेरी तलाक