शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
3
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
4
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
5
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
6
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
7
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
10
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
11
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
12
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
13
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
14
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
15
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
16
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
17
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
18
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
19
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
20
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?

तूर, हरभऱ्याचे अनुदान प्रलंबितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 3:08 PM

बहुतांश शेतकºयांना हे अनुदान अद्याप मिळाले नाही, आता शेतकºयांना या अनुदानाची प्रतिक्षा लागली आहे.

वाशिम: शासकीय खरेदी प्रक्रियेंतर्गत २०१७-१८ मध्ये हमीभावाने तूर, हरभरा विकण्यासाठी नोंदणी करणाºया लाखो शेतकºयांकडून तूर व हरभरा मोजून घेतला गेला नाही. या शेतकºयांना प्रति क्विंटल हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. तथापि, बहुतांश शेतकºयांना हे अनुदान अद्याप मिळाले नाही, आता शेतकºयांना या अनुदानाची प्रतिक्षा लागली आहे.सन २०१७-१८ मध्ये राज्यात तूर आणि हरभºयाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले होते. तथापि, बाजार समित्यांत या शेतमालास अपेक्षीत दर मिळत नसल्याने शेतकºयांकडून हमीभावाने खरेदी सुरू करण्याची मागणी करण्यात आल्यानंतर राज्यभरात शेतकºयांनी शासकीय खरेदी प्रक्रियेत शेतमाल विकण्यासाठी नोंदणी केली. खरेदी आणि नोंदणीतही वारंवार अडथळे येत गेल्याने लाखो शेतकºयांकडील तूर आणि हरभरा शासकीय खरेदी केंद्रावर मोजून घेता आला नाही. त्यामुळे या शेतकºयांना प्रति क्विंटल एक हजार रुपये आणि दहा क्विंटलच्या मर्यादेत अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानंतर लाखो शेतकºयांना या अनुदानाचे वितरणही करण्यात आले; परंतु अद्यापही शासकीय खरेदी केंद्रावर आॅनलाईन नोंदणी करणारे लाखो हरभरा आणि तूर उत्पादक शेतकरी शासनाच्या अनुदानापासून वंचित आहेत. दोन वर्षे उलटली तरी, शासनाकडून दखल घेण्यात येत नसल्याने शेतकरी हताश झाले आहेत. एकट्या वाशिम जिल्ह्यातच तूर आणि हरभरा विक्रीपासून वंचित राहिलेल्या शेतकºयांची संख्या ४ हजारांच्यावर आहे. 

ज्या शेतकºयांनी मुदतीत नोंदणी करूनही त्यांचा हरभरा किंवा तूर मोजून घेतली गेली नाही. त्यांनाच अनुदान मंजूर झाले आहे. मुदतीनंतर नोंदणी करणाºया; परंतु शेतमाल न मोजला गेल्याने अनुदानपासून वंचित शेतकºयांचा प्रस्तावही वरिष्ठस्तरावर पाठविण्यात आला; परंतु निधी मंजूरच झाला नसल्याने या शेतकºयांना अनुदान मिळू शकले नाही.-रमेश कटकेजिल्हा उपनिबंधक, वाशिम

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती