शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
2
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
3
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
4
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
5
मध्यमवर्ग त्याग करायला तयार आहेच, पण डझनभर गाड्यांचा ताफा...; जयंत पाटील यांची टिप्पणी
6
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
7
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
8
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
9
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सौंदर्यासाठी नाही, तर मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; नवरा झाला हैवान, बायकोचा घेतला जीव
11
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
12
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
13
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
14
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
15
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
16
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
17
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
18
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
19
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
20
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
Daily Top 2Weekly Top 5

पेरण्या सुरू; उगवणीची मात्र धाकधूक

By admin | Updated: July 21, 2014 00:19 IST

आकोट तालुक्यातील शेतकरी संभ्रमावस्थेत

आकोट : तालुक्यातील कोरडवाहू शेतकर्‍यांनी पेरण्या करण्यास सुरुवात केली असून, सर्व पिकांची वेळ निघून गेल्याने निसर्गावर विश्‍वास ठेवून सोयाबीनचा पेरा करण्यात येत आहे. मात्र, सोयाबीन उगवणीबाबत बहुतांश शेतकरी साशंक असल्याने त्यांच्या धाकधूक वाढलेली आहे.
यावर्षी पावसाचे येणे लांबल्याने पेरण्याही पुढे ढकलल्या गेल्या. मात्र ज्यांच्याकडे पाण्याची सोय होती ते कपाशी आणि सोयाबीन दोन्हीचा पेरा करून मोकळे झाले; परंतु नैसर्गिक पावसावर मदार असलेल्या कोरडवाहू पेरण्या मात्र पावसाअभावी खोळंबलेल्याच राहिल्या. यादरम्यान उडीद, ज्वारी आदी पिकांची वेळ निघून गेली आणि पावसाने काहीशी मेहेरबानी करण्यास सुरुवात केली; परंतु दमदार पावसाची सुरुवात झालीच नाही. त्यातही पाऊस सावत्रपणे वागला. कुठे दोन-तीनदा हलकासा तर कुठे बर्‍यापैकी चार-पाचदा बरसला. एवढय़ानेच हर्षभरीत झालेल्या कोरडवाहू शेतकर्‍यांनी पेरण्यांची लगबग सुरू केली. सर्व पिकांची वेळ निघून गेल्याने अनेकांनी सोयाबीनलाच पसंती दिली; परंतु सोयाबीनच्या उगवणशक्तीबाबत यावेळी खुद्द महाबीजनेच कानावर हात ठेवल्याने शेतकरी धास्तावलेलाच होता. पावसाच्या उदासीनतेमुळे सोयाबीनच्या उगवणशक्तीबाबत साशंकता असूनही शेतकर्‍यांनी यावेळी ह्यछातीला मातीह्ण लावण्याचे धाडस केले आहे. तालुक्याच्या उत्तरेकडील हरितपट्टय़ात धाडसाचे काम नाही. तिथे पाण्याची मुबलकता असल्याने पिके हमखास जोमदार राहतील; परंतु तालुक्याच्या दक्षिणेकडील खारपाणपट्टय़ाचा मोठा वांधा आहे. नैसर्गिक पाण्याविना हा पट्टा जगूच शकत नाही. अशा स्थितीत देवरीफाटा परिसरात चार-पाचदा बर्‍यापैकी पाऊस झाल्याने शेतकर्‍यांनी पेरा केला, करीत आहेत. मात्र, चोहोट्टा परिसरात मोठे धाकधुकीचे वातावरण आहे. पावसाच्या अनिश्‍चिततेमुळे पेरावे की न पेरावे, अशी शेतकर्‍यांची संभ्रमावस्था आहे. त्यातच काही ठिकाणी पेरलेल्या सोयाबीनचे अंकूर अद्याप भूगर्भातून बाहेरच न आल्याने शेतकर्‍यांची धास्ती अधिकच वाढली आहे.
काही बागायत शेतातही सोयाबीन उगवलेच नसल्याच्या वार्ता कानी पडत आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गात अनामिक भीती निर्माण झालेली आहे. हे सोयाबीन न उगवण्यामागे दोन महत्त्वाची कारणे सांगितली जात आहेत. त्यातील एक म्हणजे खरोखरच पेरलेल्या बियाण्याची उगवणशक्ती नष्ट झालेली असणे आणि दुसरे म्हणजे सोयाबीनच्या उगवणीसाठी हवी असलेली ओल शेतात नसणे.