शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांना तातडीने मदत द्या!

By admin | Updated: August 29, 2015 00:24 IST

अकोला जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत ठराव मंजूर.

अकोला: अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यात जमीन खरवडून गेली. तसेच पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असून, या नुकसान भरपाईपोटी जिल्ह्यातील अतवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना शासनाकडून तातडीने मदत देण्यात यावी, असा ठराव जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत शुक्रवारी मंजूर करण्यात आला.गत ४ व ५ ऑगस्ट रोजी जिल्ह्यात अतवृष्टी झाली. अतवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यात शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतजमीनही खरवडून गेली. त्यामुळे संकटात सापडलेल्या जिल्ह्यातील शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी, पिकांचे नुकसान आणि खरवडून गेलेल्या जमिनीच्या नुकसान भरपाईची मदत शासनाकडून तातडीने देण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर पांडे यांनी सभागृहात केली. त्यानुषंगाने यासंबंधीचा ठराव सभेत मंजूर करण्यात आला. हा ठराव शासनाकडे पाठविण्याचेही सभेत ठरविण्यात आले. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत बाश्रीटाकळी तालुक्यात सिंचन विहिरींसाठी शेतकर्‍यांकडून आलेले अर्ज व मंजूर अर्जासंबंधी पांडे गुरुजी यांनी विचारणा केली असता, सिंचन विहिरींसाठी शेतकर्‍यांकडून प्राप्त ८१0 अर्ज गत चार महिन्यांपासून अद्याप मंजुरीअभावी प्रलंबित असल्याची माहिती सभेत देण्यात आली. यासंदर्भात बाश्रीटाकळी पंचायत समिती गटविकास अधिकार्‍यांकडून मागविण्यात आलेला अहवाल अद्याप प्राप्त झाला नसल्याचेही सभेत सांगण्यात आले. स्थायी समितीच्या सभेला सभेला पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांनी उपस्थित राहण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याचे सभेत ठरविण्यात आले. किमान तीन दिवसआधी सदस्यांना सभेची नोटीस मिळाली पाहिजे, अशी मागणी सदस्यांनी सभेत केली. महाजल योजनेंतर्गत वाडेगाव येथे पाणीपुरवठा योजनेचे काम करण्यात आले; मात्र जलवाहिनीद्वारे पाणी पोहोचत नसल्याचा मुद्दा सदस्य डॉ.हिंमत घाटोळ यांनी सभेत उपस्थित केला. त्यानुषंगाने यासंदर्भात चौकशी करण्याचे निर्देश अध्यक्ष शरद गवई यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कोपूलवार यांना दिले. जिल्ह्यातील वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आणि उपलब्ध रोपे, कर वसुली, जिल्हा परिषद अंतर्गत रस्त्यांची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आलेली कामे व इतर विषयांवर सभेत चर्चा करण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्ष शरद गवई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सभेला मुख्य कार्यकारी अधिकारी एम.देवेंदर सिंह, उपाध्यक्ष गुलाम हुसेन देशमुख, अतिरक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष पवार, सभापती गोदावरी जाधव, सदस्य चंद्रशेखर पांडे गुरुजी, डॉ.हिंमत घाटोळ, पुंडलिक अरबट, रामदास लांडे, गजानन उंबरकार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद इनमादार व संबंधित अधिकारी उपस्थित होते.