शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
5
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
6
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
7
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
8
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
9
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
10
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
11
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
12
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
13
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
15
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
16
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
17
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
18
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
19
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
20
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
Daily Top 2Weekly Top 5

जात पडताळणीचे प्रस्ताव सोमवारपर्यंत स्वीकारणार

By admin | Updated: July 18, 2015 01:48 IST

ग्रामपंचायत निवडणुका: सुटीच्या दिवशीही कक्ष राहणार सुरू.

अकोला: ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मागासवर्गीयांसाठी आरक्षित प्रभागातून निवडणूक लढविणार्‍या इच्छुक उमेदवारांच्या जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव सोमवार, २0 जुलैपर्यंत विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून स्वीकारण्यात येणार आहेत. प्रस्ताव स्वीकारण्यासाठी शनिवार व रविवार या सुटीच्या दोन दिवशीही विभागीय जाती पडताळणी समिती कार्यालयातील कक्ष सुरू राहणार आहे. जिल्ह्यातील २२0 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका आणि ४८ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी ४ ऑगस्ट रोजी मतदान घेण्यात येणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये आरक्षित जागेवर निवडणूक लढविणार्‍या इच्छुक उमेदवारांना उमेदवारी अर्ज सादर करताना, अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे प्रस्ताव सादर केल्याची पोचपावती सादर करणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने ग्रामपंचायत निवडणुकीत आरक्षित जागांवर निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांकडून अकोल्यातील विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात जात वैधता प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव दाखल करण्यात येत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांकडून जात वैधता प्रमाणपत्रासाठी विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे प्रस्ताव सादर करण्यासाठी शुक्रवार, १७ जुलै ही शेवटची तारीख यापूर्वी निश्‍चित करण्यात आली होती. दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मागासवर्गीयांसाठी आरक्षित प्रभागातून निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांच्या जात पडताळणीचे प्रस्ताव २0 जुलैपर्यंत स्वीकारण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगामार्फत विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयांना देण्यात आला. उमेदवारांचे जात पडताळणीचे प्रस्ताव स्वीकारण्यासाठी १८ ते २0 जुलैपर्यंत विभागीय जात प्रमाणपत्र समिती कार्यालयातील एक कक्ष सुरू ठेवण्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार शनिवार, १८ जुलै व रविवार, १९ जुलै या सुटीच्या दोन दिवसातही उमेदवारांकडून जात पडताळणीचे प्रस्ताव स्वीकारण्यात येणार आहेत.