शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
2
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
3
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
4
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
5
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
6
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
7
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
8
मध्यमवर्ग त्याग करायला तयार आहेच, पण डझनभर गाड्यांचा ताफा...; जयंत पाटील यांची टिप्पणी
9
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
10
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
11
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
12
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
13
"सौंदर्यासाठी नाही, तर मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; नवरा झाला हैवान, बायकोचा घेतला जीव
14
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
15
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
16
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
17
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
18
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
19
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
20
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

हिवरखेड येथील शेतरस्त्याची दैना

By admin | Updated: July 20, 2014 01:42 IST

तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथील रस्त्यांची दुरवस्था.

हिवरखेड : येथील मुंजावाट गोर्धा या शेतरस्त्याची पार दैना झाली आहे. या रस्त्यावरून बैलबंडीसारखे वाहन जाणेही अशक्य असल्यामुळे शेतात विविध साहित्य नेताना शेतकर्‍यांना मोठी अडचण होत आहे.
हिवरखेड येथील शेतशिवाराकडे जाण्यासाठी मुंजवाट गोर्धा हा ३ ते ४ किलोमीटर अंतराचा कच्चा रस्ता आहे. गावातील बहुतांश शेतकर्‍यांची शेती या रस्त्यावरच येत असल्याने या रस्त्याचा मोठय़ा प्रमाणात वापर होत असतो. गत काही दिवसांपूर्वी रोजगार हमी योजनेंतर्गत या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती; परंतु थोड्याच दिवसांनी हे काम बंद पडले. रस्त्याचे काम बंद पडल्याचे कारणही कोणाला कळू शकले नाही. त्यामुळे हा रस्ता जैसे थे असून, पावसाळय़ात थोडाही पाऊस पडल्यानंतर रस्ता पूर्ण चिखलमय होतो. त्यामुळे रस्त्यावरून बैलबंडीही जाऊ शकत नाही आणि माणसाला पायीसुद्धा चालता येत नाही. अशा परिस्थितीत विविध कामासाठी लागणारे साहित्य शेतामध्ये न्यावे तरी, कसे हा प्रश्न शेतकर्‍यांसमोर उपस्थित होतो. अनेक शेतकरी, तर नाईलाजास्तव बियाणे, खते आदी साहित्य नेण्यासाठी चक्क गाढवांचा वापर करीत आहेत. संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांनी शेतकर्‍यांच्या समस्या लक्षात घेऊन रस्ता मजबूत करण्याचा प्रयत्न करावा, अशी मागणी येथील शेतकर्‍यांकडून करण्यात येत आहे.