शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

खदानींचे मोजमाप, उत्खननाची होणार तपासणी

By admin | Updated: July 14, 2014 01:22 IST

अकोला: जिल्ह्यातील खदानींचे मोजमाप आणि त्यामधील गौण खनिज उत्खननाची तपासणी करून, आठ दिवसांत अहवाल सादर करण्याचा आदेश

अकोला: जिल्ह्यातील खदानींचे मोजमाप आणि त्यामधील गौण खनिज उत्खननाची तपासणी करून, आठ दिवसांत अहवाल सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकार्‍यांनी भूमिअभिलेख व बांधकाम विभागासह उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांना दिला आहे. सोलापूर जिल्हाधिकार्‍यांविरुद्ध बाबूराव जाधवार यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर उच्च न्यायालयाने गेल्या २ मे रोजी आदेश पारित केला. त्यानुसार गौण खनिजाच्या अवैध उत्खननाबाबत करावयाच्या विविध कारवाईसंदर्भात आणि त्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखून कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच याबाबत करण्यात आलेल्या कारवाईचा अनुपाल अहवाल येत्या ३0 ऑगस्टपूर्वी शपथपत्राद्वारे सादर करण्याचे आदेशही उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुषंगाने जिल्ह्यातील खनिपट्टाधारकांनी केलेल्या गौणखनिजाच्या उत्खननाचे मोजमाप व तपासणी तसेच गौण खनिजाच्या विनापरवानगी उत्खननाचे मोजमाप व तपासणी पूर्ण करून, खनिपट्टा करारनाम्याची मुदत संपल्यानंतर गौण खनिजाचे उत्खनन सुरू असल्याची प्रकरणे, विनापरवानगी उत्खनन व खनिपट्टा करारनाम्यातील अटी आणि शर्तीच्या उल्लंघनाची प्रकरणे यासंदर्भात छाननी व तपासणी करुन, दंडात्मक कारवाई व गुन्हे दाखल करण्याची कारवाई ३१ जुलैपर्यंंत पूर्ण करण्याचे आदेश शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकार्‍यांना पत्राव्दारे देण्यात आले आहेत. गौण खनिजाच्या अवैध उत्खननासंदर्भात केलेल्या कारवाईचा अहवाल शपथपत्राद्वारे न्यायालयात सादर करावयाचा असल्याने केलेल्या कारवाईची माहिती १४ ऑगस्टपर्यंंत सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. खनिपट्टाधारकांच्या खदानींचे मोजमाप आणि त्यामधील गौण खानिजाच्या उत्खननाची तपासणी करून आठ दिवसांत अहवाल सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी दिले आहे.