शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

एचआरमध्ये करा स्पेशलायझेशन

By admin | Updated: June 14, 2014 23:29 IST

सक्षम मनुष्यबळ खाते विकसित होऊ लागले, ज्यामध्ये नोकर भरती, कर्मचारी आरोग्य, आरोग्य विमा, अपघात-आपत्ती विमा अशी अनेक उपांगे विकसित झाली.

अकोला : एचआर म्हणजे मनुष्यबळ खाते. औद्योगिक क्रांतीनंतर फॅक्टरीज वाढल्या. त्यामुळे कामगारसंख्या वाढली. शेती कामगारांऐवजी औद्योगिक कामगारवर्ग शहरा-शहरातून वाढत गेला. त्याचप्रमाणे ऑफिस कर्मचारी वर्ग वाढत राहिला. अर्थातच त्यांची भरती करणे, त्यांना प्रशिक्षण देणे, त्यांच्या समाजकल्याणाची, सामाजिक सुरक्षेची जबाबदरी घेणे, ही कामे आपोआप निघाली. त्याकरिता पूर्वीचे फक्त नोकर भरती करणारे ह्यपर्सनल खातेह्ण जाऊन एक सक्षम मनुष्यबळ खाते विकसित होऊ लागले, ज्यामध्ये नोकर भरती, कर्मचारी आरोग्य, आरोग्य विमा, अपघात-आपत्ती विमा अशी अनेक उपांगे विकसित झाली. सरकारी कंपन्यांमध्ये नवरत्न कंपन्या आहेत, बँका येतात आणि विविध क्षेत्रांत, भौगोलिक स्तरावर त्या कार्यरत आहेत. दुसरीकडे खासगी क्षेत्रात परदेशी भांडवल सहभागाने कार्यकक्षा रुंदावलेली आहे. कॉडा सेंटर्स, बीपीओज, केपीओज, विदेशी कंपन्या, बँका आणि अनेक प्रकारचे खासगी उद्योग याकरिता विविध शैक्षणिक गुणवत्तेचे व कौशल्ये असलेले मनुष्यबळ लागते. त्यांच्या नेमणुका, त्यांची देखभाल, त्यांच्या बदली-बढतीचे नियोजन व प्रत्यक्षात व्यवस्थापन करण्यासाठी मनुष्यबळ खाते सांभाळणारी कुशल टीम असण्याची किंवा त्यातील अनेक विभाग-उपविभाग कार्यक्षमतेने हाताळण्यासाठी कुशल अधिकार्‍यांची गरज आहे.

** एचआरमधील नवीन कामे

जॉब अँनालिसिस, रिस्ट्रक्चरिंग अँनालिसिस, स्किल्स डेव्हलपमेंट, एम्प्लॉई रिलेशन्स, रिक्रुटमेंट, स्पेशालिस्ट हायरिंग, बिझनेस अँडमिनिस्ट्रेशन, ट्रेनिंग, कॉम्पेन्सेशन यांसारखी नवीन कामे आता एचआर करू शकतात. ही सर्व कामे कार्यक्षमतेने करण्यासाठी तितक्याच तोलामोलाचे कार्यक्षम मनुष्यबळ असायला हवे. कारण प्रभावी कंपनीसाठी परिणामकारक मनुष्यबळ धोरण असणे, हेदेखील व्यवस्थापनाचा एक प्राण समजले जाते. एमबीए या संकल्पनेचा गेल्या दोन-तीन दशकांत चांगलाच प्रभाव वाढलेला आहे. बिझनेस किंवा अँडमिनिस्ट्रेशन तसेच मार्केटिंग-फायनान्स अशी स्पेशलाइज्ड एमबीए आहेत. त्याप्रमाणे एचआरमध्ये स्पेशलायझेशन करण्याला महत्त्व आहे. कारण व्यापार-व्यवसाय वृद्धिंगत झाल्यावर त्यातील मनुष्यबळाचे व्यवस्थापन करण्यासाठी तितकीच अधिकारी व अनुभवसंपन्न माणसे असायला हवीत.

** एमबीए एचआर अभ्यासक्रम

सहा महिन्यांपासून ते दोन वर्षांपर्यंतचे एचआर विषयातील कोर्सेस आहेत. पदवीधर विद्यार्थी एचआरमध्ये डिप्लोमा मिळवू शकतात किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमाद्वारे पदविका/पदवी प्राप्त करू शकतात. डिप्लोमा इन एचआरएम हा एक वर्षाचा नियमित बॅचचा तर सण्डे बॅचचा कोर्स उपलब्ध आहे. टाटामधून दोन वर्षांचा मास्टर इन पर्सनल मॅनेजमेंट व इंडस्ट्रीयल रिलेशन्सही करता येतो. पर्सनल मॅनेजमेंट, इंडस्ट्रीयल रिलेशन्स याबरोबरीने सोशल सायन्स, बिहव्हिअरेल सायन्स, एचआर, कम्युनिकेशन, पब्लिक अँडमिनिस्ट्रेशन या विषयांचा अंतर्भाव असतो. (प्रतिनिधी)