शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
2
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
3
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
4
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
5
मध्यमवर्ग त्याग करायला तयार आहेच, पण डझनभर गाड्यांचा ताफा...; जयंत पाटील यांची टिप्पणी
6
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
7
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
8
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
9
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सौंदर्यासाठी नाही, तर मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; नवरा झाला हैवान, बायकोचा घेतला जीव
11
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
12
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
13
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
14
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
15
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
16
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
17
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
18
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
19
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
20
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
Daily Top 2Weekly Top 5

सर्वच क्षेत्रात महिलांना आरक्षणाची गरज महिला मेळाव्यात माफसूचे कुलगुरू मिश्र यांचे प्रतिपादन

By admin | Updated: June 3, 2014 01:55 IST

अकोला : देशातील सत्तर टक्के महिला शेतकरी, शेतमूजर असून, खर्‍या अर्थाने महिलांचे सक्षमीकरण करायचे असेल तर सर्वच क्षेत्रात त्यांना ३० टक्के आरक्षण द्यावे लागणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र पशू व विज्ञान विद्यापीठाचे (माफसू) कुलगुरू डॉ.आदित्यकुमार मिश्र यांनी केले.

अकोला : देशातील सत्तर टक्के महिला शेतकरी, शेतमूजर असून, खर्‍या अर्थाने महिलांचे सक्षमीकरण करायचे असेल तर सर्वच क्षेत्रात त्यांना ३० टक्के आरक्षण द्यावे लागणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र पशू व विज्ञान विद्यापीठाचे (माफसू) कुलगुरू डॉ.आदित्यकुमार मिश्र यांनी केले.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व महिला आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने सोमवार, २ जून रोजी कृषी विद्यापीठाच्या डॉ. के.आर. ठाकरे सभागृहात आयोजित स्त्री शक्ती उत्सव कार्यक्रमात डॉ. मिश्र प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी होते. व्यासपीठावर शिक्षण विस्तार संचालक डॉ. विजय माहोरकर, संशोधन संचालक डॉ. प्रदीप इंगोले, डॉ.सी.एन. गांगडे आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना, डॉ. मिश्र यांनी कृषिप्रधान देशात ७० टक्के महिला शेती व शेतीशी निगडित कामे करीत आहेत. तथापि या महिला मुख्य प्रवाहापासून वंचित असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. देशाला भविष्यात लागणारे अन्नधान्याची गरज बघता प्रतिमाणूस उत्पादन वाढवावे लागणार आहे. महिला शेतकर्‍यांना सक्षम करू न त्यांना शेतीचे उच्चतंत्रज्ञान समजावून सांगितल्यास त्याचे चांगले परिणाम दिसू लागतील. त्यासाठी महिलांचे सक्षमीकरण करणे क्रमप्राप्त आहे. म्हणूनच सर्वच क्षेत्रात महिलांना आरक्षणाची गरज आहे. सवर्च क्षेत्रात महिलांनी भरारी घेतली आहे. मग ग्रामीण शेतकरी महिलांना मागे ठेवून चालणार नसल्याचे ते म्हणाले. महिलांना आदीशक्ती अशी उपमा देऊन, महिला विकास तरच देश विकास होणार असल्याचे अधोरेखित केले.
या प्रसंगी डॉ.दाणी यांनी स्त्री शक्ती उत्सव हा महिलांना प्रोत्साहन देण्यासाठीच आयोजित केलेला कार्यक्रम असून, ज्या कर्तबार महिलांनी आपले कसब वापरू न शेती क्षेत्रासह विविध क्षेत्रात प्रगती साधली त्यांचा हा कौतुक सोहळा असल्याचे सांगितले.
या स्त्री शक्ती कार्यक्रमाला विदर्भातील सर्वच जिल्ह्यातील महिलांची उपस्थिती होती. सभागृह महिलांनी भरू न गेले होते.