शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
2
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
3
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
4
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
5
मध्यमवर्ग त्याग करायला तयार आहेच, पण डझनभर गाड्यांचा ताफा...; जयंत पाटील यांची टिप्पणी
6
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
7
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
8
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
9
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सौंदर्यासाठी नाही, तर मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; नवरा झाला हैवान, बायकोचा घेतला जीव
11
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
12
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
13
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
14
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
15
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
16
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
17
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
18
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
19
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
20
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
Daily Top 2Weekly Top 5

कुरुम आरोग्य केंद्र बनले समस्यांचे ‘आगार’

By admin | Updated: July 20, 2014 02:01 IST

आनंदीबाई जोशी पुरस्काराने सन्मानित कुरूम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक पदे रिक्त.

कुरुम: महिला व बालकांच्या आरोग्यासंबंधी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल वर्ष २00७-0८ मध्ये डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्काराने सन्मानित झालेले येथील गवरजाबाई रामनाथजी सारडा प्राथमिक आरोग्य केंद्र हे सोयी-सुविधांचा अभाव व वैद्यकीय अधिकार्‍यासंह अनेक पदे रिक्त असल्यामुळे समस्यांचे आगार बनले आहे. येथील आरोग्य केंद्रांतर्गत ३४ गावे असून, ६ उपकेंद्र आहेत. गत काही महिन्यांपासून या आरोग्य केंद्रात कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकार्‍यांची दोन पदे रिक्त आहेत. तसेच १ स्वास्थ्य अभ्यांगता (एल. एच. व्ही.), ५ मलेरिया आरोग्य सेवक (एमपीडब्ल्यू), १ मुख्यालय आरोग्य सेविका (एएनएमएचक्यू), १ परिचर आदी जागा रिक्त असल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात ७ ते ८ महिन्यांपासून करारावर असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. खंडारे हे मे महिन्यात, तर डॉ. भोपते हे जून महिन्यात आरोग्य केंद्र सोडून गेल्याने माना व शेलुबाजार येथील उपकेंद्रातील डॉक्टरांवर अतिरिक्त भार पडला आहे. येथे महिला वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे गरोदर महिलांची कुचंबणा होते. या केंद्रातील शौचालय व बेसिनचे नळ बंद आहेत. तर काही शौचालय तुंबल्याने आरोग्य केंद्रात घाणीचे साम्राज्य पसरलेले दिसते. प्रसूत महिलांकरिता गरम पाण्यासाठी सौर हिटर आहे; परंतु गरम पाणी उपलब्ध होत नाही. वैद्यकीय अधिकारीच नसल्यामुळे कर्मचार्‍यांवर कोणाचेही नियंत्रण नाही. त्यामुळे रुग्णांची हेळसांड होताना दिसत आहे. संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी या समस्यांकडे लक्ष देऊन या आरोग्य केंद्रातील रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.