शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकला केळकर समितीचा अहवाल !

By admin | Updated: December 10, 2014 00:23 IST

विदर्भातील शेतक-यांना दोन वर्षापासून अहवालाची प्रतिक्षाच.

राजरत्न सिरसाट/अकोलादुष्काळावर मात करण्यासाठी दुरगामी उपाययोजना असलेले धोरण समतोल विकास उच्चाधिकार समितीने आखले असून, राज्य शासनाला यासंबधीचा अहवाल केव्हाचाच सुपूर्द करण्यात आला आहे. राज्यातील दुष्काळाची छाया या अहलावरही पडल्याचे चित्र दिसत असून, शासनाचा विदर्भाचा विकास खरोखरीच साधायचा असेल, तर हा अहवाल विधीमंडळासमोर आणून शेतकर्‍यांना दिलासा देण्याची गरज आहे. मागासलेल्या विदर्भातील सिंचनाचा अनुशेष वाढला आहे. हा अनुशेष भरू न काढण्यासाठी राज्यापालांच्या निर्देशान्वये स्थापन केलेल्या समतोल प्रादेशिक विकास उच्चाधिकार समितीने दोन वर्षांंपूर्वी विदर्भाचा दौरा करू न एक अहवाल तयार केला. दुष्काळ पडला तर कोणते प्रयत्न करावेत, यासाठीचे दूरगामी धोरण कसे असावे, यासाठीचे महत्त्वाचे मुद्दे या समितीने शासनाला सादर केलेल्या अहवालात नमूद आहेत.या अहवालात प्रामुख्याने पाणलोट क्षेत्र विकासावर भर देण्यात आला आहे. यासाठी राज्याकरिता २८ हजार कोटींची शिफारस करण्यात आली असल्याची माहिती विश्‍वसनीय सुत्रांकडून प्राप्त झाली आहे. यातील जवळपास आठ हजार कोटी विदर्भावर खर्च केला जाणार आहे. यामध्ये खारपाणपट्ट्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या अहवालात पश्‍चिम विदर्भातील खारपाणपट्टय़ाचा प्रामुख्याने विचार करण्यात आला आहे. पूर्णा नदीच्या पूर्व व पश्‍चिम या दोन्ही बाजूंनी साधारणत: ८९२ खेड्यातून ४,६९२ चौरस किलोमीटर क्षेत्र क्षतीग्रस्त आहे. यामध्ये अमरावतीचे १७३४ चौरस किलोमीटर, अकोला जिल्हा १९३९ चौरस किलोमीटर आणि बुलडाणा जिल्ह्यातील १0१५ चौरस किलोमीटर क्षेत्राचा अंतर्भाव आहे. या भागातील खार्‍या पाण्याच्या स्रोतामुळे येथे शेती करणे अवघड तर आहेच, पिण्याचे पाणी खारे असल्याने त्याचे दुष्परिणाम लोकांना सहन करावे लागत आहेत. या पृष्ठभूमीवर या अहवालात स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे. * मोठे उद्योग, मानव विकासावर भर केळकर समितीने (ह्युमन डेव्हलपमेंट) मानव निर्देशांक विकासावर भर दिला असून, या भागात मोठे उद्योग कसे येतील, याचाही विचार या अहवालात केला आहे. या उच्चाधिकार समितीने या भागातील अनेक तज्ज्ञांसह शेतकर्‍यांची मतेदेखील जाणून घेतली आहेत. शेतकरी आत्महत्यानंतर देण्यात आलेल्या पॅकेजचा अभ्यास करण्यात आला आहे. शेतकरी आत्महत्याबाबतही तज्ज्ञांनी आढावा घेतला आहे.