शहरं
Join us  
Trending Stories
1
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
2
जयंत पाटील यांचा CM देवेंद्र फडणवीसांना सल्ला; म्हणाले, “ताफ्यात फक्त एक कार अन्…”
3
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
4
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
5
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
6
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
7
"सौंदर्यासाठी नाही, तर मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; नवरा झाला हैवान, बायकोचा घेतला जीव
8
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
9
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
10
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
11
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
12
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
13
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
14
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
15
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
16
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
17
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
18
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
19
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
20
कान्समध्ये अवतरली जणू स्वप्नातील परी! मिंट-ग्रीन गाऊनमध्ये आलिया भट्टचा 'प्रिन्सेस लूक' व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भूमी अभिलेखाची माहिती मिळणार ‘वेबसाईट’वर!

By admin | Updated: June 12, 2014 20:31 IST

अकोला जिल्हय़ातील भूमी अभिलेखासंबंधीची माहिती जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाच्या ‘वेबसाईट’वर लवकरच उपलब्ध होणार आहे.

अकोला : जिल्हय़ातील भूमी अभिलेखासंबंधीची माहिती जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाच्या ह्यवेबसाईटह्णवर लवकरच उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेती, प्लॉट व इतर मालमत्तासंबंधीची माहिती या वेबसाईटच्या माध्यमातून मालमत्ताधारकांना बघण्यासाठी उपलब्ध होणार आहे.
जिल्हय़ातील शेती, प्लॉट, भूसंपादन मोजणी प्रकरणे, नझूल फेरफार व इतर प्रकारची भूमी अभिलेखासंबंधीची माहिती भूमी अभिलेख विभागाच्या जिल्हा अधीक्षक कार्यालयाला वरिष्ठांकडे सादर करावी लागते. त्यासाठी लागणारी माहिती या कार्यालयाला जिल्हय़ातील तालुकास्तरावर असलेल्या उपअधीक्षक (भूमी अभिलेख) कार्यालयाकडून वारंवार मागितली जाते. त्यामध्ये जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाचा बराच वेळ जातो.
तसेच वेळेवर घेण्यात येणारी माहिती अचूक आहे की नाही ते तपासून पाहावी लागते. या पृष्ठभूमीवर यापुढे जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाला वारंवार जिल्हय़ातील भूमी अभिलेख विभागाच्या कार्यालयाला माहिती मागविण्याची आता गरज पडणार नाही. जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयामार्फत ह्यडीएसएलआर अकोला डॉट इनह्ण ही वेबसाईट तयार करण्यात आली असून, या वेबसाईटवर भूमी अभिलेख विभागाच्या तालुक्यातील कार्यालयांमार्फत अद्ययावत माहिती उपलब्ध होणार आहे.
कार्यालयीन माहितीसोबतच जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाच्या या वेबसाईटवर शेती, प्लॉट, भूसंपादन मोजणी प्रकरणे, नझूल फेरफार (नमुना-ड),जमीन मोजणीचे शुल्क, नागरिकांची सनद, नक्कल शुल्क, सात-बारा उतारा इत्यादी संबंधीची माहिती जिल्हय़ातील मालमत्ताधारकांना माहितीसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे.
भूमिअभिलेखाची माहिती वेबसाईटवर उपलब्ध झाल्यास भूमिअभिलेख विभागासह मालमत्ताधारकांच्या सोयीचे ठरणार आहे.