शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पीपीई किटमुळे वाढल्या डॉक्टरांच्या समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 09:05 IST

लॅमिनेटेड किट ठरतेय त्रासदायक

अकोला : कोरोना विरुद्धच्या लढ्यात ‘फंटलाइन वॉरियर’ म्हणून कार्यरत असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टर व पॅरामेडिकल स्टाफला आता संरक्षणात्मक किटमुळे विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सहा तासांपेक्षा अधिक पीपीई किट घालणारे डॉक्टर व पॅरामेडिकल स्टाफ डोके दुखी, चक्कर आणि वाढत्या रक्तदाबाच्या समस्येला बळी पडत असल्याचे समोर येत आहे.कोरोनाबाधितांच्या संख्येत कमालीची वाढ होत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाचे वॉर्ड फुल्ल झाले असून, अतिदक्षता विभागात खाट मिळणे कठीण झाले आहे. अशा स्थितीत खऱ्या अर्थाने डॉक्टर लढवय्यांसारखे काम करीत आहेत. कोरोनाबाधितांचे वॉर्ड डॉक्टरांसाठी हॉटस्पॉट झाले आहे. संसर्ग टाळण्यासाठी पीपीई किटचा वापर के ला जातो. सर्वोपचार रुग्णालयात लॅमिनेटेड व नॉन लॅमिनेटेड अशा दोन्ही प्रकारच्या किट उपलब्ध आहेत; मात्र महागडी किट व मागणीच्या तुलनेत पुरवठा अल्प होत असल्याने डॉक्टरांना साधारण सहा ते आठ तास ते घालून राहावे लागते. एकदा किट घातल्यास खाणेपिणे करता येत नाही. वॉशरूममध्ये जाणेदेखील टाळले जाते. काही डॉक्टर्स यासाठी ‘अ‍ॅडल्ट डायपर्स’चाही वापर करतात. ड्युटीची वेळ संपल्यावर व पीपीई किट काढून कचरापेटीमध्ये टाकल्यावरच ते सामान्य जीवनात परत येतात. लॅमिनेटेड म्हणजे प्लास्टिक कोट असलेल्या किटमुळे निवासी डॉक्टर व इन्टर्नला मोठा त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी आहेत.दोन तासातच कपडे होतात ओलेएका डॉक्टरने सांगितले, लॅमिनेटेड किट घालून रुग्णसेवा देणे कठीण झाले आहे. ही किट घातल्यानंतर शरीराला हवा मिळत नाही. घाम इतका येतो की तास दोन तासातच संपूर्ण कपडे ओले होतात. डोळ्यात घाम येणे, जळजळ होण्यास कारणीभूत ठरते. सतत ग्लोब घातल्यामुळे त्वचेची समस्या निर्माण होते. पीपीई किट घालण्यापूर्वी डोके कव्हर घातले जाते, ज्यामुळे डोकेदुखी होते. तर, सतत मास्क घातल्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. यामुळे हृदयाचा ठोका वाढतो. परिणामी, डॉक्टर चक्कर येऊन पडण्याचा घटना वाढल्या आहेत.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्याAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय