शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

गृहमंत्र्यांनी घेतली अकोला पोलिसांच्या उपक्रमाची दखल; 'लोकमत'ची बातमी केली ट्विट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 16:49 IST

या उपक्रमास प्रसिद्धी देणाऱ्या ‘लोकमत’चे वृत्त ट्विट करीत देशमुख यांनी अकोला पोलिसांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे.

अकोला : कोरोना संसर्गाची साखळी खंडीत करण्याच्या उपाययोजनांचा एक भाग म्हणून अकोलापोलिस दलाने ऑटोरिक्षा चालकांसाठी सुरु केलेल्या ‘नो मास्क- नो सवारी’या उपक्रमाची राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दखल घेतली आहे. या उपक्रमास प्रसिद्धी देणादेणारे ‘लोकमत’चे वृत्त ट्विट करीत देशमुख यांनी अकोला पोलिसांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे.

अकोला शहर आणि जिल्ह्यात सुरू असलेला कोरोनाचा कहर रोखण्यासाठी ‘नो मास्क, नो डील’ हा उपक्रम पोलिसांनी सुरू केला असून, त्यातंर्गतच शहरात धावणाऱ्या जवळपास २ हजार ऑटोवर ‘नो मास्क, नो सवारी’चे पोस्टर्स लावण्याची मोहीम सुरू केली आहे. त्यासाठी पहिले दोन दिवस ऑटोचालकांची शहर वाहतूक पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी स्ट्रीट मीटिंग घेऊन त्यांना ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या अंतर्गत सर्व ऑटोचालकांनी स्वत: मास्क घालावे व ऑटोमध्ये प्रवास करणाऱ्या सवारीलासुद्धा मास्क घालणे बंधनकारक करावे, अशा सूचना केल्या आहेत. सवारी मास्क घालण्यासाठी तयार नसल्यास अशी सवारी ऑटोमध्ये बसवून घेऊ नये, या माध्यमातून स्वत:ची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी ऑटोचालकांना सूचना देण्यात आल्या असून, त्यांना नियम पाळणे बंधनकारक करण्यात आले आहे. नियम मोडणाºया ऑटोवर कारवाई करण्यात येणार आहे.पोलिसांच्या या उपक्रमाबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने २७ सप्टेंबर रोजी सचित्र प्रकाशीत केले. राज्याचे गृह मंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या टिष्ट्वटर हँडलवर ‘लोकमत’चे हे वृत्त ट्विट करीत अकोला पोलिसांच्या उपक्रमाचे कौतुक केले आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी अकोला पोलिस राबवित असलेली ही मोहिम कौतुकास्पद असल्याचे ट्विट अनिल देशमुख यांनी केले आहे. खुद्द गृहमंत्र्यांकडून कौतुकाची थाप मिळाल्याने अकोला पोलिसांचा उत्साह वाढला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAnil Deshmukhअनिल देशमुखPoliceपोलिसTwitterट्विटर