शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
5
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
6
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
7
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
8
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
9
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
10
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
11
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
12
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
13
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
14
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
15
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
16
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
18
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
19
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
20
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
Daily Top 2Weekly Top 5

अंकुरलेल्या कपाशीवर गोनोशिफॅलमचे आक्रमण!

By admin | Updated: July 30, 2014 01:12 IST

‘काळी म्हैस’ (गोनोशिफॅलम) नावाच्या किडीने अंकुरलेले कपाशीचे पीक फस्त करणे सुरू केल्याने विदर्भातील शेतकरी हवालदिल झाला आहे.

अकोला : पूरक पाऊस नसल्याने दुबार, तिबार पेरणी करणार्‍या शेतकर्‍यांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे. पेरणीनंतर पुन्हा पाऊसच आला नसल्याने, 'काळी म्हैस' (गोनोशिफॅलम) नावाच्या किडीने अंकुरलेले कपाशीचे पीक फस्त करणे सुरू केल्याने विदर्भातील शेतकरी हवालदिल झाला आहे. यंदा दीड महिना उशिराने पावसाला सुरुवात झाली. त्यानंतरच शेतकर्‍यांना पेरणीसाठीची तिफण बाहेर काढावी लागली. महागडे बियाणे घरात ठेवण्यापेक्षा शेतकर्‍यांनी पेरणीचा निर्णय घेतला. अमरावती विभागातील पाच जिल्हय़ात जवळपास ७५ टक्के क्षेत्रावर पेरणी आटोपली आहे; तथापि पाऊस नियमीत नसल्याने पीकं संकटात सापडली आहेत. एका दिवसाच्या पावसानंतर आठ दिवसांचा खंड पडत असल्याने काळी म्हैस नावाच्या किडीचा पिकावर उपद्रव वाढला आहे. सोयाबीन व हरभरा ही या किडीची आवडीची पिकं आहेत; परंतु सध्या या किडीने कपाशी पिकावर आक्रमण केले आहे. एका दिवसात जवळपास अर्धे शेत ही कीड फस्त करीत असल्याने, शेतकर्‍यांना अतिरिक्त कीटकनाशकांची फवारणी करावी लागत आहे. त्यामुळे वर्‍हाडातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अकोला तालुक्यातील मौजे हिंगणी बु. येथे कृषी विभागाच्या तज्ज्ञ चमूने संयुक्तपणे कापूस पेरणी क्षेत्राची पाहणी केली. त्यावेळी या चमूला कपाशीची रोपे काळी म्हैस (गोनोशिफॅलम) या किडीने कुरतडल्याचे दिसून आले. या किडीने केलेल्या नुकसानीची आर्थिक पातळी मोठी आहे. या किडीचा वर्‍हाडात सर्वत्र उद्रेक झाला असून, अकोट तालुक्यातील कुटासा येथे ७५ टक्के कपाशीचे पीक या किडीने फस्त केल्याचे आढळून आले आहे. कपाशी या पिकासह मूग लागवड क्षेत्रावर मुळकुंज या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. वर्‍हाडातील अकोला, वाशिम व बुलडाणा जिल्हय़ात अद्याप पूरक पाऊस झाला नसल्याने शेतकर्‍यांना किडींच्या प्रादुर्भावाचा सामना करावा लागत आहे.