शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

४८ तासांत चौघांचा मृत्यू; २२ पॉझिटिव्ह, २५ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2020 6:50 PM

CoronaVirus Akola New चार कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्याने कोरोनाबळींची संख्या २७४ झाली आहे.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असला तरी, मृत्यूचे सत्र मात्र सुरुच आहे. गत ४८ तासांत जिल्ह्यात आणखी चार कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्याने कोरोनाबळींची संख्या २७४ झाली आहे. या दोन दिवसांमध्ये आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये २१ व रॅपिड अ‍ॅन्टिजेन चाचण्यांमध्ये एक असे एकूण २२ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ८,२६७ झाली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवार सोमवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १३७ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २१ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ११२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये सुंदर नगर येथील तीन, रामदास पेठ व जीएमसी येथील प्रत्येकी दोन जण, राऊतवाडी, सी. ओ. कॉलनी, मुकुंद नगर, राजंदा, गोरक्षण रोड, वरखेड बाशीर्टाकळी, आर. एस. हॉटेल रेल्वे स्टेशन, जुने शहर, डाबकी रोड, न्यू महसूल कॉलनी, आदर्श नगर, मूर्तिजापूर व बार्शीटाकळी व सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.तीन पुरुष, एक महिलेचा मृत्यूरविवारी बार्शीटाकळी तालुक्यातील भेंडी महाल येथील ५८ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. सोमवारी अकोट येथील दखनी फाईल भागातील ८० वर्षीय महिला, अकोला शहरातील गोकुळ कॉलनी, जवाहर नगर येथील ४० वर्षीय पुरुष व बाभुळगाव जहांगीर येथील ८५ वर्षीय पुरुष या तीघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.२५ जणांना डिस्चार्जगत दोन दिवसांत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून २०, आयुर्वेदिक महाविद्यालय येथून तीन, कोविड केअर सेंटर मुर्तिजापूर येथून एक व हॉटेल स्कायलार्क येथून एक अशा एकूण २५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.४९४ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८,२६७ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ७,४९९ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २७४ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ४९४ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला