शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

निराट-वैराट येथे आग : पाच गोठे भस्मसात

By admin | Updated: May 13, 2017 18:49 IST

आगीत पाच गोठे जळून भस्मसात झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले.

चारा व शेती उपयोगी अवजारे जळून खाकबोरगाव वैराळे : अकोला तालुक्यातील निराट-वैराट गावात अचानक भरदुपारी १२.३0 ते १ वाजताच्या दरम्यान आग लागली. या आगीत पाच गोठे जळून भस्मसात झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. निराट-वैराट येथे शनिवारी आग लागून सुरेंद्र हरिभाऊ रेंगे यांचे राहते घर भस्मसात झाले. घरातील संपूर्ण अन्नधान्य, कपडे जळून खाक झाले. त्यामुळे, त्यांचे जवळजवळ एक लाख रुपयाचे नुकसान झाले. यासोबतच दिनकर पिंजरकर, सुनील परनाटे, दिनकर घाटे, अनंतराव पिंजरकर, समाधान पिंजरकर, शालीग्राम घाटे यांचे गुराचे गोठे या आगीत जळून खाक झाले असून, गोठय़ातील गुरांसाठी लागणारा चारा कडबा, कुटार तसेच शेती उपयोगी साहित्य वखर, डवरे, पेरणीसाठी लागणारे तिफण, सरते असे जवळजवळ दोन लाख रुपये किमतीचे साहित्य या आगीत जळून खाक झाल्याने हे शेतकरी पेरणीचा हंगाम काही दिवसावर येऊन ठेपल्याने संकटात सापडले आहेत.निराट-वैराट गावाला आग लागली. त्यावेळी वीज पुरवठा खंडित असल्याने आग विझवण्यासाठी वेळेवर पाणी उपलब्ध झाले नाही. तसेच अग्निशमन दलाच्या बंबांना पाचारण केले असता, दीड तास उशिराने गावात दाखल झाले. तोपर्यंत आगीने उग्ररूप धारण केले होते. सुदैवाने यावेळी हवा नसल्यामुळे मोठी हानी टळली. गावातील प्रत्येक व्यक्ती घरात आहे तेवढे पाणी आणून आग विझवण्यासाठी प्रयत्न करीत होता. येथील सरपंच सुनील परनाटे, ग्रामसेवक राजीव गरकल, तलाठी ढोरे यांनी पूर्णा नदीवरून गोपाळराव परनाटे यांनी वीटभट्टीसाठी घेतलेल्या पाण्याची पाइपलाइन आग लागलेल्या ठिकाणी आणून आग विझवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. ही आग आटोक्यात आणण्यासाठी राजू परनाटे, प्रभुदास शेंगोकार, प्रदीप परनाटे, वसंतराव परनाटे, अक्षय इंगळे यांच्यासह गावातील सर्वच नागरिकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. (वार्ताहर)